सोलापूर-पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन जिमखाना येथे स्वर्गीय डॉ. प्रमोद मुळे यांच्या स्मरणार्थ आयोजित पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत येथील मनीष रावत यांनी ५५ वर्षांखालील गटात शानदार विजेतेपद पटकावले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील ४२५ खेळाडूंनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत मनीष रावत यांनी नागपूरच्या बसाब चौधरी यांचा ३-० अशा सरळ सेटमध्ये दणदणीत पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सामन्यादरम्यान त्यांनी आपल्या सर्व्हिसमध्ये केलेले वैविध्य आणि त्याचा यशस्वीरीत्या शॉटमध्ये करून मिळवलेले गुण उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरले. त्यांच्या या चमकदार खेळाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली, तसेच उपस्थितांनी त्यांच्या उत्कृष्ट फिटनेसचेही भरभरून कौतुक केले.
मनीष रावत हे सध्या सोलापूर आयकर विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान आणि सचिव झेड. एम. पुणेकर यांनी अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
———-























