सोलापूर -महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने राजीव देसाई यांनी नूतन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्वागत केले .
या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल येथील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा खेळाडूंना लवकरात लवकर उपलब्ध होऊन मिळाव्यात अशी मागणी देसाई यांनी केली. याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल तसेच भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा धोरणांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी यांनी दिली.






















