सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे उपक्रमशील गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी दूरदृष्टीने राबविलेले उपक्रमांची दक्षिणच्या लोकप्रतिनिधीनी दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना व लोकशाहीची समज विकसित करणारा एकदिवसीय प्रतिकात्मक सरपंच व
शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी अभिनव प्रयोग, सुव्यवस्थित व प्रेरणादायी शालेय वातावरण निर्मिती करण्यासाठी सुरू केलेला अभिनव व प्रेरणादायी फाईव्ह स्टार शाळा उपक्रमांची दखल घेत पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती संदिप टेळे, उपसभापती पटणे तसेच सर्व पंचायत समिती सदस्यांनी गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन त्यांचा सत्कार केला.
दक्षिण सोलापूर तालुका बहुभाषिक असल्याने स्पर्धात्म युगात विद्यार्थ्यांना टिकण्यासाठी इंग्रजी भाषा गरजेचे आहे. कन्नड व मराठी भाषांमुळे इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याने बीडीओ मनोज राऊत यांनी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार १५ दिवसातच अनेक शाळांमधील विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलण्यास सुरूवात केले. शिवाय बीडीओ राऊत यांनी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन पाच टप्यात “फाईव्ह स्टार शाळा ” योजना सुरू करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अनेक गावातील मुलांचे इंग्रजु भाषेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले.
एक दिवसीय प्रतिकात्मक सरपंच उपक्रमामुळे तालुक्यातील चार गावांमध्ये विद्यार्थ्यांना एक दिवस सरपंच होण्याचा मान मिळाले. यामुळे नेतृत्व गुण, प्रशासकीय कामाची माहीती , जबाबदारीची भावना व लोकशाहीची समज विकसित झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
दोन्ही उपक्रमात बीडीओ राऊत यांनी उत्कृष्ट कार्य केल्याने दक्षिणमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासास हातभार लागत आहे . म्हणुन बीडीओ राऊत यांचा सत्कार करण्याचा ठराव हत्तूर पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी मांडली. त्यानुसार त्यांचा अभिनंदन करून सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















