बार्शी – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जिव्हाळा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्याचा विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा सावळे सभागृह येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. विक्रम सावळे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन पाटील मांजरे व महाराष्ट्र क्लासेसचे गुलानी सर, प्रा. जी. टी. जाधव, स्मिता देशपांडे मॅडम, सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक इंगळे सर, पप्पू हनुमंते या सर्वांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पत्रकार सचिन आपसिंगकर हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम खाली पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला. राजू थोरात, श्याम कसबे, राहुल कांबळे, निलेश खुडे या सर्व संस्थेच्या पदाधिकारी, अधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला