बार्शी – येथील हरीभाई देवकरण प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या १०० विद्यार्थ्यांनी हिंदुस्थानातील पहिला मानाचा आजोबा गणपती सोलापूर येथे श्री गणपती अथर्वशीर्ष पठण केले व गाणी सादर केली. पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना अथर्वशीर्ष पठणाने केली. शाळा समितीचे अध्यक्ष सुरेश ्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब बाबू मंकणी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संस्कृत शिक्षक निखिल बडवे यांच्याबरोबर म्हंटले. संगीत शिक्षिका सावनी कुलकर्णी यांच्यासह गणपती गाणी म्हणून आपली सेवा अर्पण केली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. आजोबा गणपती ट्रस्टच्यावतीने मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, पर्यवेक्षक गणेश नेवरे, सहशिक्षक माणिक साळसकर, निखिल बडवे, राघवेंद्र पिल्ले तसेच शिक्षिका सावनी कुलकर्णी व भक्ती माळवदकर यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला.
Post Views: 111