सोलापूर – येथील बसवेश्वर विचार मंचच्यावतीने प्रतिष्ठेचा समजला जाणारा आदर्श शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष मल्लेश पुरवंत यांनी केले आहे.
पुरस्काराचे यंदाचे हे 32 वे वर्षे आहे. या पुरस्कारासाठी शहर व जिल्ह्यातून पूर्व प्राथमिक,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला प्रस्ताव दि. 20 ऑगस्टपर्यंत पाठवावेत.बसवेश्वर विचार मंचच्या वतीने गेल्या 32 वर्षापासून शहर व जिल्ह्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व उपक्रमशील शाळांचा सन्मान केला जातो.शहर व जिल्ह्यात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. तरी इच्छुकांनी मल्लेश पुरवंत ,144 ,पश्चिम मंगळवार पेठ,बलिदान चौक सोलापूर मो.नंबर 82 75 44 83 50 या पत्त्यावर आपले प्रस्ताव पाठवावेत अथवा सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 4