Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इंदापूरचा सुपरस्टार, देशातील उंच घोडा ‘सिकंदरचा’ हार्ट अटॅकने मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 15, 2024
in maharashtra
0
इंदापूरचा सुपरस्टार, देशातील उंच घोडा ‘सिकंदरचा’ हार्ट अटॅकने मृत्यू
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्याच्या सर्वात जवळचा प्राणी म्हटलं तर बैलाचा उल्लेख होतो. तसेच लग्नकार्य म्हणा किंवा कोणता सोहळा म्हणा तर घोड्याचा उल्लेख केला जातो. पूर्वीच्या काळी घोड्यावरूनच अनेक ठिकाणी प्रवास केला जायचा. मात्र, आता ती परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते.

आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. अशाच एका घोड्यासंदर्भात एक हृदयद्रावक बातमी इंदापुरातून समोर आली आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावात निलेश अष्टेकर या शेतकऱ्याने लहानपणापासून सांभाळ केलेला नुकरा प्रजातीतील ‘सिकंदर’ नावाच्या घोड्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर हे जिवापाड ‘सिंकदर’ या घोड्याचा साडेसात वर्षांपासून सांभाळ करत होते. काल शुक्रवारी सकाळी ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या जाण्याने अष्टेकर कुटुंबंतील सदस्य गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला संपूर्ण गावाकऱ्यांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.

‘सिकंदर’ घोडा हा देशातीत उंच घोड्यांमध्ये त्याचा उल्लेख झाला होता. त्याचे वय साधारण ९ वर्ष इतके होते. ‘सिकंदर’च्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील होते. निलेश अष्टेकर यांनी सांगितले की, ”सिकंदर हा एक सुपरस्टार आणि शानदार असा घोडा होता. त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. पंजाबवरून त्याला आणण्यात आले होते. त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे”. माणूस आणि प्राणी यांचे नाते नेहमीच राहिले आहे. त्यात घोडा, बैल आणि कुत्रा हे माणसाच्या अत्यंत जवळ असलेले प्राणी आहेत. घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांचा सांभाळ केला जातो. मात्र, त्यांचे निधन झाल्यानंतर हृदयाच्याजवळ असलेला व्यक्ती गेला असल्याची भावना मनात तयार होते. ‘सिकंदर’च्या जाण्याने अष्टेकर कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे.

दरम्यान, तब्बल २५ वर्षे घोड्यांच्या उच्च जात कुळीचा अभ्यास केल्यानंतर निलेश अष्टेकर यांनी इंदापूर तालुक्यातील अकोले गावाची या स्टड फार्मसाठी निवड केली. त्यामध्ये अगदी तब्बल ६९ इंचापर्यंतच्या उंच घोड्यांची देखभाल करणे आणि त्यातून उच्च प्रतीची वंशावळ निर्माण करण्याचा प्रयोग त्याने सुरू केला. नुकरा, मारवाडी, काठेवाडी अशा विविध जाती सांभाळणे हे उच्च श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. ‘सिकंदर’ला पाहायला राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी यायचे. या घोड्याला एका कंपनीने चक्क ७० लाख रुपयांची बोली लावली होती. हा घोडा प्रजननासाठी वापरला जातो त्याच्या एका वेळेच्या प्रजननाच्या प्रक्रियेचा खर्च ३१ हजार रुपयापर्यंत आकारला जायचा.

Post Views: 22
Previous Post

महाविकास आघाडीने विधानसभेला शड्डू ठोकला; ताकदीने एकत्रित निवडणूक लढवणार

Next Post

नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं,

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं,

नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं,

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी.

February 18, 2026

संत सेवालाल महाराजांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ : आमदार बबनराव लोणीकर.#public #marathinews

February 18, 2026

प्रभात इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

February 18, 2026

न्यू हायस्कूल परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची रहिवाशांची मागणी..#public #solapurnews

February 18, 2026

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686226

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697