अक्कलकोट – आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आपण येथे भेट दिल्यानंतर स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक वेळी नविन स्फूर्ती मिळते. त्यामुळे भावी वाटचालीत काम करण्याकरिता स्वामी दर्शनाने दरवेळी मिळणारे अनुभव नेहमीच प्रेरणा देत असतात असे मनोगत
महाराष्ट्र विधान परिषद आमदार चित्रा ताई वाघ यांनी व्यक्त केले. ते नुकतेच श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे आले असता बोलत होते
. याप्रसंगी वटवृक्ष मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
आमदार चित्राताई वाघ यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी प्रथमेश इंगळे, शहाजी भाऊ पवार, प्रविण देशमुख मंदिर समिती सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, संजय पवार, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – आमदार चित्राताई वाघ यांचा सत्कार करताना महेश इंगळे, शहाजी भाऊ पवार, प्रविण देशमुख इत्यादी दिसत आहेत.
























