बार्शी – येथील श्री भगवंत सहकारी पुरवठा मंडळी लि. ची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कुरडुवाडी रोडवरील मातृ मंदिरात मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सभेची सुरुवात दीपप्रज्वलनाने व भारतमाता, स्व. काकासाहेब सुलाखे व सहकारी महर्षी तात्यासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. सभेचे प्रास्ताविक संचालक रामचंद्र गौरकर यांनी केले. सभेचे विषय व अहवाल वाचन व्यवस्थापक रवींद्र माचवे यांनी केले.
संस्थेस मार्च २०२६ अखेर रुपये १५,३५,७५६/- नफा झाला असून निव्वळ नफा रुपये ३,५६,७४४/- इतका आहे. सभासदांना १० टक्के प्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आला आहे.
सभासदांच्यावतीने प्रमोद काळे, नीळकंठ हिरेमठ व सुशील पाटील यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. तसेच ज्येष्ठ संचालक डॉ. बी. वाय. यादव यांनी स्व. तात्यासाहेब देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला व सहकारी चळवळीतील त्यांच्या योगदानाबद्दलची माहिती सांगितली.
संस्थेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी (अंबेजवळगेकर) यांनी संस्थेच्या दोन्ही पेट्रोल पंपावर सीएनजीची एजन्सी मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. लवकरच ते पूर्ण होईल. इलेक्ट्रीकल गाड्यासाठी चार्जिंग सेंटर सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी संस्थेचे प्रयत्न युद्ध पातळीवर चालू आहेत. तसेच संस्थेवर कुठल्याही बॅंकेचे कर्ज नाही. पण कुठला धंदा करण्यापूर्वी त्याच्या नफा-तोट्याचा विचार करुनच पावले टाकावी लागतात. पण लवकरच संस्थेची ताडसौंदणेकडील जागा विक्री करुन तुळजापूर रोडकडे वेअरहाऊस काढण्याचा संस्थेचा मानस आहे. सभासदांना काही अडचणी व सूचना असतील तर मला, संचालकांना व व्यवस्थापकाला सांगा त्या निश्चितपणे दूर केल्या जातील.
सभेचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष उमेश ठोंबरे यांनी केले. यावेळी सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 23