Friday, August 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पत्नीचा कोयत्याने खून केलेल्या आरोपीला पोलिसांनी केले दोन तासात जेरबंद

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in crime
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – तालुक्यातील गोपाळपूर येथे पत्नीचा खून करुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले आहे. ही घटना बुधवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. लक्ष्मी भानुदास वाघ असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती भानुदास वाघ याने कोयत्याने तिचा निघृण खून केल्याचे समोर आले आहे.  

या खून प्रकरणाची तालुका पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, तालुक्यातील मौजे गोपाळपूर येथे मागील दहा दिवसांपूर्वी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागे ऊस तोडणीसाठी जळगाव येथील तीन ते चार तोळ्या ऊस तोडीसाठी आलेल्या आहेत. त्यामध्ये भानुदास आनंदा वाघ (वय ४५ ) हा ऊसतोड कामगार त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ व ३५ वर्षे हिच्या सोबत व दोन मुलासह ऊस तोडी टोळी मध्ये राहत होता. दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री बारा वाजताचे सुमारास यातील आरोपी भानुदास आनंदा वाघ ( वय ४५ रा. दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव ) या आरोपीने तिची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ हिला घरगुती भांडणाच्या कारणावरून ऊस तोडीच्या कोयत्याने गळ्यावर मानेवर वार करून जिवे ठार मारले होते.

सदरची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना डायल ११२ या क्रमांकावर मिळाल्यानंतर तात्काळ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. मुजावर यांनी सदरची माहिती येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना कळवून घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक श्री.मुजावर, पीएसआय वडने, भारत भोसले एपीआय रेळेकर मॅडम व इतर कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.


त्यानंतर सदरचा आरोपी हा रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडाच्या मागून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागील परिसर शोध घेऊन दोन तासांमध्ये भानुदास आनंदा वाघ याला शिताफीने ताब्यात घेतले व अटक केली असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार कोयता पोलिसांनी जागीच जप्त केलेला आहे. 

दरम्यान आरोपी हा ऊस तोडी कामगार फिरस्ता असून सदर आरोपी फरार होण्याअगोदरच पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळलेल्या आहेत. आरोपीचे आसपासच्या परिसरात कोणीही नातेवाईक वगैरे नसून आरोपीकडे कसल्याही प्रकारचा मोबाईल क्रमांकही नसताना पोलिसांनी अतिशय तत्परतेने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यांमध्ये तात्काळ अटक केलेली आहे व खुनासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

सदर आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर १०० – २६ बी एन एस कलम १०३ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक  विभावरी रेळेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे,भारत भोसले, पोलीस विजय गायकवाड,हवालदार सतीश चंदनशिवे, पोलीस हवालदार साळुंखे, बाजीराव काकडे,अभिमन्यू गरड, पोलीस कॉन्स्टेबल हजारे, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ,सुहास देशमुख,विजय आवटी सागर गवळी यांच्या पथकाने केली आहे.

Post Views: 83
Previous Post

धुळीच्या ढगात अडकले शिवाजी नगर रेल्वे अंडरब्रिज; आंदोलनाचा इशारा

Next Post

नगरसेविका वनिता पाटील यांचा जातीचा दाखला रद्द 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरसेविका वनिता पाटील यांचा जातीचा दाखला रद्द 

ताज्या बातम्या

सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन

August 20, 2026

स्वतःच्या शेतात सर्पदंश झालेल्या 32 वर्षीय शेतकऱ्याचा अखेर मृत्यू 

August 20, 2026
विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

August 20, 2026
अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

August 20, 2026

जिल्हा परिषद धाराशिवचा अभिनव उपक्रम : समुदाय संसाधन व्यक्तींना प्रति प्रस्ताव मिळणार १,००० रुपयांचे प्रोत्साहन

August 20, 2026
रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

August 20, 2026
श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

August 20, 2026

 गाळे सील करण्याचे उद्दिष्ट न पाळल्याने १४ कर्मचाऱ्यांना दंड

August 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1096156

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!