Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन प्रशासन अधिकाऱ्यांसह दोन लिपिकांना निलंबित करण्याचे आयुक्तांनी सिईओंना दिले निर्देश

नारायण लोखंडे यांनी बैलगाडीत बसून केलेल्या उपोषणाची दखल घेत आयुक्तांचा शिक्षण विभागाला दणका

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
दोन प्रशासन अधिकाऱ्यांसह दोन लिपिकांना निलंबित करण्याचे आयुक्तांनी सिईओंना दिले निर्देश
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : जालना जिल्ह्यात अनेक वर्षांपासून विविध कार्यालयामध्ये लिपिकवर्गीय कामासाठी शिक्षकांच्या नेमणूका केलेल्या होत्या.यामुळं हक्काचे शिक्षक शाळेवर न जाता कार्यालयातच कामे करीत होते.अगोदरच शिक्षकांच्या शेकडो जागा रिक्त असतांना शिक्षकांना शाळाबाह्य कामे दिल्यामुळं विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची तक्रार बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे यांनी विभागीय आयुक्त,शिक्षणमंत्री,ग्रामविकास सचिव,शिक्षण सचिवाकडे केलेली होती.तसेच अनेक आंदोलने,उपोषणे केली होती.त्याची दखल घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांना नियमबाह्यरित्या कामे करणाऱ्या जबाबदार अधिकारी,कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील शिक्षकांच्या केलेल्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्यांचे प्रकरण जिल्हा परिषद शिक्षण विभागाला चांगलेच भोवले आहे.तसेच आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून ताशेरे ओढले आहे.सि ई ओ वर्षा मीना यांना आदेशीत केलेल्या पत्रात म्हटले आहे की विभागीय कार्यालयाची “मान्यता / परवानगी” शिवाय जालना जिल्ह्यामध्ये नियमबाह्य रित्या करण्यात आलेल्या वर्ग-३, वर्ग-४ व शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची तात्पुरती व्यवस्था / प्रतिनियुक्ती असे सर्व आदेश / पत्र रद्य करुन अशा कर्मचाऱ्यांना त्यांचे मुळ पदस्थानेच्या ठिकाणी परत पाठविण्यात यावे तसेच नियमबाह्य असे आदेश / पत्र निर्गमित करणाऱ्या दोषी अधिकारी / कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येवून केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रस्तूत कार्यालयास १५ दिवसांचे आंत सादर करण्याबाबत निर्देश देवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामूळे नारायण लोखंडे यांनी नियमबाह्य करण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्यांचे विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि.०७/०३/२०२४ पासून आमरण उपोषण सुरु केलेले होते.

त्यानंतर चौकशी अहवाल सादर केलेला असून चौकशी अहवाल व त्यानुसार दिलेल्या निर्देशांचे जिल्हा परिषद, जालना कार्यालयाने पालन केलेले नाही. त्यामूळे शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, जालना येथील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सबंधित आस्थापना हाताळणारे वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ सहाय्यक यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येवून केलेला कार्यवाहीचा अनुपालन अहवाल दि.१०/०४/२०२४ पावेतो प्रस्तूत कार्यालयास सादर करावा असे निर्देश देण्यात आलेले होते. कारणे दाखवा नोटीस सुध्दा बजावण्यात आलेली आहे.

तरी सुध्दा आपले कार्यालयाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ‘सेवार्थ’ प्रणालीसह इतर शैक्षणिक डाटाबेस प्रणाली-सरल डाटाबेस प्रणाली, ऑनलाईन संच मान्यता, स्टूडेंट पोर्टल, बदली पोर्टल, पवित्र पोर्टल व इतर कार्यालयीन संगणकीय कामांची पुर्णवेळ जबाबदारी इत्यादीकरिता पुनश्च सहशिक्षकांचे दि.०५/०७/२०२४ अन्वये नियमबाह्य आदेश निर्गमित करण्यात आल्याचे माझे निदर्शनास आले असून सदन शिक्षकांच्या नियमाबाह्य नियुक्त्यांच्या अनुषंगाने नारायण लोखंडे यांनी विभागीय कार्यालयासमोर पूनश्च आमरण उपोषण सुरु केले होते, सदर बाब ही निश्चितःच खेदजनक आहे.

वास्तविक बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ मधील कलम-२७, शासन निर्णय व शासनाने वेळावेळी दिलेल्या निर्देशांचे आपल्या कार्यालयामार्फत हेतूतः उल्लंघन करण्याची निती अवलंबिण्यात येत असल्याचे माझे मत झालेले आहे.

त्यामूळे आपणास स्पष्ट निर्देश देण्यात येते की, शैक्षणिक कामाच्या व्यतिरिक्त सबंधित १० शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातील निह्यमबाह्यरित्या निर्गमित दि.०५/०७/२०२४ बाबतची संचिका आपणांकडे सादर करणारे सबंधित कनिष्ठ सहाय्यक / वरिष्ठ सहाय्यक/ कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना निलंबित करण्यात येवून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात यावी तसेच शिक्षणाधिकारी (प्रा) यांचे १ ते ४ दोषारोपत्र तसेच यापुर्वी संदर्भ क्र. (११) अन्वये आपणास देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने व सदर १० शिक्षकांच्या करण्यात आलेल्या नियमबाह्य नियुक्तांच्या अनुषंगाने आपला खुलासा प्रस्तूत कार्यालयास दि. ३०/०८/२०२४ पावेतो करण्यात यावा असे पत्रात म्हटले आहे.आता मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना जबाबदार अधिकाऱ्यांवर / कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करून विभागीय आयुक्तांच्या आदेशाचे पालन करणार की दोषी अधिकाऱ्यांना संरक्षण देणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.संबंधितांवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे नारायण लोखंडेनी सांगितले.

प्रशासनाने नारायण लोखंडेवर केले होते गुन्हे दाखल.

शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मागील वर्षी नारायण लोखंडे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पालकांचा मोर्चा काढला होता.त्याची दखल घेत मंत्री अब्दुल सत्तारांनी सिईओ वर्षा मीना यांना प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले होते.मात्र दखल घेतली नसल्याने 1 जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात विध्यार्थ्यांची शाळा भरवली होती.त्यानंतर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून लक्ष वेधण्यासाठी रस्त्याच्या बाजूला शाळा भरवली होती.मात्र जिल्हा प्रशासनाने समस्या सोडविण्याऐवजी विध्यार्थ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या नारायण लोखंडेवर गुन्हे दाखल केले होते.त्यानंतर उपायुक्तांमार्फत प्रतिनियुक्त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती.

मात्र तरीही प्रतिनियुक्त्या रद्द न केल्यामुळं मागील महिन्यात भोकरदन येथे भरपावसात बैलगाडीत बसून पाच दिवस उपोषण केले होते.तसेच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर देखील दोन दिवस उपोषण करावे लागले.त्यानंतर सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाईचे आदेश काढण्यात आले.प्रशासनाच्या मनमानी व चुकीच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य माणसाला मोठा संघर्ष करावा लागतो त्यानंतरच प्रशासन दखल घेते अस या प्रकरणातून दिसून आले.यामुळं अनेकांचे धाबे दणादले असल्याची चर्चा आहे.

Post Views: 39
Previous Post

नेर येथे कार्यकर्ता संवाद दौरा व शाखेचे उदघाटन संपन्न

Next Post

तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,

तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,

ताज्या बातम्या

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026
धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

May 26, 2026
सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

May 26, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

May 26, 2026

किटलीची जागा घेतली थर्मासने

May 26, 2026
२० वर्षांपासून भंगार व्यावसायिकाचा न्यायासाठी संघर्ष ; अन्यथा दुकानाच्या जागेवर जिवंत समाधी घेण्याचा इशारा

२० वर्षांपासून भंगार व्यावसायिकाचा न्यायासाठी संघर्ष ; अन्यथा दुकानाच्या जागेवर जिवंत समाधी घेण्याचा इशारा

May 26, 2026

विना परवाना दर्शनास प्रवेश दिल्या प्रकरणी मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांवरगुन्हे दाखल

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879784

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697