पंढरपूर – गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत सावता माळी यांच्या भेटीला श्री पांडुरंगाच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूर नगरीमधून होत असते. सदर या पालखीचे प्रस्थान समस्त काशीकापडी समाज बांधवाच्या मठामधून होत असते. या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी (दि.८ ऑगस्ट ) होत असून या पालखी प्रस्थानाची प्रथा गेल्या २०६ वर्षांपासून आजतागायत सुरू असून या सर्व पालखी सोहळ्याचे नियोजन व आयोजन श्री काशी कापडी समाजाचे चेअरमन नागेशभाऊ गंगेकर हे समाज बांधवांच्या सहकार्याने उत्तमरित्या करीत असून हा पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरी नामाच्या गजरामध्ये शनिवार( दि.८ ) रोजी सकाळी ८ वाजता होते.
पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरातील मारूती मंदिरासमोर अभंग, भजन होवून हा पालखी सोहळा श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान होतो. या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या पादुका डोक्यावर आणण्याचा मान श्री काशी कापडी समाज बांधवांना असल्याने पांडुरंगाच्या पादुकांचे पालखीमध्ये विराजमान झाल्यानंतर असंख्य भाविक भक्त, वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहामध्ये माऊलींचे मठाजवळ अभंग भजन झाल्यानंतर हा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर अंबाबाई पटांगण या येथील नवीन पुल या मार्गावरून अरणकडे प्रस्थान होतो. पहिला मुक्काम श्री विठ्ठल मंदिर रोपळे, दुसरा मुक्काम रविवार दि.९ रोजी श्री हनुमान मंदिर आष्टी येथे भजन, पूजन, कीर्तनामध्ये केला जातो. त्यानंतर हा पालखी सोहळा सोमवारी (दि.१०) तीर्थक्षेत्र अरण येथील विजयभाऊ कुलकर्णी यांच्या वाड्यामध्ये विसावा घेऊन भजन, कीर्तन, पूजन करून हा सोहळा शिंदे वाड्याकडे जातो. त्यानंतर तीन दिवस पालखीचा मुक्काम राहतो. भजन, पूजन, कीर्तन करून हा सोहळा मध्ये केले जाते. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
या पालखी सोहळ्यामध्ये मानकरी म्हणून सर्वश्री विजय कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, पादुकाचे मानकरी प्रकाश कळसे, चोपदार उत्तम नागटिळक, देखरेख सारथी पंडीत सुर्वे हे करत असून पालखी सोहळा नियोजनबध्द यशस्वी करण्यासाठी रवि टमटम, विशाल पिंगळे, दिलीप वाडेकर, विवेक गंगेकर, भालेश टमटम, औदुंबर गंगेकर, शेखर वाडेकर, गब्बर इंदापूरकर आदिसह संपूर्ण समाज बांधव परिश्रम घेत असून या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी असंख्य भाविक भक्त वारकरी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे चेअरमन नागेश गंगेकर यांनी केले आहे.
Post Views: 6