Thursday, September 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कॉरिडॉरसाठी भूसंपादनाबाबत नगराध्यक्षांसह त्यांना पाठिंबा असलेल्या नगरसेवकांची तसेच सत्ताधारी नगरसेवकांच्या भूमिके बाबत उत्सुकता… 

तरुण भारतbyतरुण भारत
September 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर  – येत्या ९ सप्टेंबर रोजी पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजिण्यात आलेली आहे. या सभेच्या विषय पत्रिकेवर एकुण २८ विषय ठेवण्यात आलेले आहे. या मध्ये सर्वात महत्वाच्या विषय म्हणजे प्रस्तावित कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्याबाबतच्या ठरावाचा विषय होय. त्यामुळे सभेतील या विषया बाबत नगराध्यक्षांसह त्यांच्या पाठीमागे असलेल्या नगरसेवकांची तसेच सत्ताधारी नगरसेवक मंडळींची नेमकी भूमिका काय राहणार ? याकडे सर्वसामान्य पंढरपूरकरांचे विशेषत: शेकडो कॉरिडॉर बाधितांचे लक्ष लागले आहे. या शिवाय अतिक्रमणे,पार्किंग आदी विषयांवर देखील नगरसेवकांची भूमिका काय असणार आहे हे देखील या वेळी स्पष्ट होणार आहे.
पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार, ९ सप्टेंबर रोजी नगरपालिकेच्या छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत तब्बल २८ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. या मध्ये येथील मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरसाठी भूसंपादन करण्याबाबतचा ठराव हा या सभेतील सर्वाधिक महत्त्वाचा विषय मानला जात आहे. भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मंदिर परिसरात कॉरिडॉर प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या सभेत या विषयावर नगराध्यक्षांसह, सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पालिका निवडणूकीत कॉरिडॉर विषयाचे भांडवल करुन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह अनेक नगरसेवकांनी संभाव्य कॉरिडॉर बाधितांची सहानुभूती मिळविली होती. दस्तुरखुद्द नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालकेंनी देखील कॉरिडॉरला विरोध दर्शवुन मोठ्या फरकांनी पालिका निवडणूकीत विजय मिळविला होता. पालिका निवडणूकीच्या वेळी डाँ.भालके या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या. कॉरिडॉर होवू देणार नाही असे ठामपणे सांगून त्यांनी बाधित मंडळींची सहानुभूती मिळविली होती. मात्र त्यावेळची आणि सध्याची एकंदर परिस्थिती वेगळी आहे. कारण मध्यंतरीच त्यांनी व त्यांच्या पाठीशी असलेल्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत ( एकनाथ शिंदे गटात) प्रवेश केलेला आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष सध्या राज्यातील सत्तेत एकत्रित नांदत आहेत. त्यामुळे दस्तुरखुद्द नगराध्यक्षांनीच आणि त्यांच्या मागे असलेल्या नगरसेवकांनी जर या विषयाला विरोध दर्शविला तर सत्तेतील शिवसेना पक्ष तोंडावर पडणार आहे. याचे दूरोगामी परिणाम राज्यातील युतीच्या सत्तेवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे नगराध्यक्षा आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांची या विषयावर काय भूमिका असेल या बद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
या शिवाय नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर तसेच शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांचा विषयही सभेच्या अजेंड्यावर आहे. अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक जागांच्या वापराचा प्रश्न निर्माण होत असल्याने नगरपालिका प्रशासन अतिक्रमणांबाबत कोणती भूमिका घेते, याकडेही नागरिकांचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, पार्किंग आणि आरोग्यकर वसुलीच्या ठेक्याचा विषय पुन्हा एकदा नगरपालिकेच्या सभेत येत आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी हा ठेका देण्यात आला होता. मात्र, भाविकांकडून व नागरिकांकडून वाद निर्माण झाल्यानंतर तसेच या विषयासंदर्भातील बाबी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर संबंधित ठेका रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा पार्किंगचा ठेका काढण्याबाबत ठराव सभेत मांडण्यात येणार असल्याने या विषयावर नगरसेवकांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. पार्किंग ठेका पुन्हा देण्याच्या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे या चर्चांना सभेत कोणते स्वरूप मिळते आणि नगरपालिकेकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
———————————
चौकट : ( डिजिटल फलकांसाठी जागा निश्चित करण्याचा विषय )
शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल जाहिरात फलक लावण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल फलकांसाठी निश्चित जागा ठरविणे आणि त्यासाठी ठेका देण्याबाबतचा विषयही सभेत चर्चेला येणार आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण रोखण्याबरोबरच जाहिरात फलकांमधून नगरपालिकेला उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
———————————
चौकट : ( सभेतील विषयांच्या भाऊगर्दीमुळे सर्वसाधारण सभेकडे लक्ष )
कॉरिडॉरसाठी भूसंपादन, अतिक्रमण हटविणे, अतिक्रमणाच्या ठिकाणी संरक्षक भिंती, पार्किंग ठेका, आरोग्यकर वसुली आणि डिजिटल जाहिरात फलकांसह एकूण २८ विषय सभेच्या विषयपत्रिकेवर आहेत. त्यामुळे ९ सप्टेंबर रोजी होणारी पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे.
Post Views: 3
Previous Post

शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Next Post

“आमदार मुक्कामी आपल्या गावी” अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

“आमदार मुक्कामी आपल्या गावी” अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ताज्या बातम्या

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026
मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

September 3, 2026
माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

September 3, 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

September 3, 2026
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

September 3, 2026
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

September 3, 2026
बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

September 3, 2026

२० सप्टेंबरपर्यंत मिळकतकरावर मिळणार सवलत

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1158715

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!