सोलापूर : बाळीवेस शक्तिपूजा व समाजसेवा मंडळाच्या 2026-27 या वर्षासाठी नूतन पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी प्रथमेश थोबडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी उद्योजक व मंडळाचे आधारस्तंभ महेश थोबडे, सुधीर थोबडे, राजशेखर हिरेहब्बू, माजी नगरसेवक केदार उंबरजे, सुनील गुंगे, रेवणसिद्ध आवजे, जयप्रकाश अमणगी, रेवणसिद्ध माळी, अजित धुम्मा, संकेत थोबडे, प्रतीक थोबडे, निखिल थोबडे, सागर हिरेहब्बू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
उपाध्यक्ष- बसवचंद्र अमणगी व गणेश अक्कलकोटे, खजिनदार – गंगाधर कुडल, महादेव पटणे व राजशेखर म्हेत्रे. कार्याध्यक्ष- सिध्दार्थ खुने, लेझीमप्रमुख- रोहित आवजे व सचिन तुकमाळी. मिरवणूकप्रमुख- रामलिंग पाटील व आविष्कार पांढरे. प्रसिध्दीप्रमुख- अमोल रामपुरे, चंदन पाच्छापुरे व इरेश डबरे, डेकोरेशन प्रमुख- किरण पांढरे व सचिन मठपती यांची निवड करण्यात आली. तर पूजा प्रमुखपदी नागनाथ वाले, मल्लिनाथ वाले, संजय वाले व सुधीर वाले यांची निवड झाली.