Sunday, August 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना २०२६ चा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – पत्रकार तथा पालखी सोहळा पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाजी फुरडे-पाटील यांना या वर्षीचा (२०२६) प्रतिष्ठेचा “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंढरपूर व जळगाव येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर यांच्यावतीने दरवर्षी पालखी सोहळ्यातील कार्य तसेच भागवत धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा संस्थेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै. भाऊसाहेब ऊर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ “भागवत धर्म प्रसारक” पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप श्री विठ्ठलाची मूर्ती, मानाचा वारकरी फेटा, शाल, श्रीफळ व संत मुक्ताबाई चरित्र ग्रंथ असे आहे.

यावर्षीचा पुरस्कार शहाजी फुरडे-पाटील यांना जाहीर झाल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

शहाजी फुरडे-पाटील हे गेली वीस वर्षे लोकमतचे बार्शी प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. बार्शी तालुक्यातील कांदलगाव येथील रहिवासी असलेल्या फुरडे-पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांची वारकरी परंपरा भक्तिभावाने जपली आहे. माध्यम क्षेत्रात कार्य करताना त्यांनी मागील १८ वर्षांपासून पालखी मार्गावरील वारीचे सातत्यपूर्ण वार्तांकन करुन भागवत धर्माचा विचार, प्रचार व प्रसार घरोघरी पोहोचविण्याचे कार्य केले आहे.

आषाढी वारीदरम्यान श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज तसेच आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. इंदापूर ते पंढरपूर, फलटण ते पंढरपूर तसेच मुक्ताई सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर वारी मार्गावरील विविध सामाजिक, धार्मिक व मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने लेखणी चालविली आहे. आषाढी एकादशी सोहळा, महापूजा आणि पंढरपूर शहरातील वार्तांकनही त्यांनी प्रभावीपणे केले आहे.

सन २००८ मध्ये लोकमतचे तत्कालीन संपादक सुधीर महाजन व पंढरपूर कार्यालय प्रमुख प्रताप नलावडे यांनी त्यांना वारी वार्तांकनासाठी संधी दिली. पहिल्याच वर्षी त्यांनी माऊली पालखी सोहळ्यावर विविध विषयांवर लेखन करुन वेगळी ओळख निर्माण केली. वारीतील ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, शंकर टेमघरे, विलास काटे, राजेंद्रकृष्ण कापसे, राजाभाऊ चोपदार व पुंडलिक मोरे महाराज यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

भगवंत मंदिरात श्रावण महिन्यात आयोजित जयवंत बोधले महाराजांच्या प्रवचनमालेवर “बोधवाणी” सदरातून सलग पाच वर्षे त्यांनी लेखन केले आहे. तसेच पंढरपूर ते मुक्ताईनगर जाणाऱ्या पांडुरंगराय पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासादरम्यान बार्शीतील दुपारच्या विसाव्याचे नियोजन व वारकरी सेवेतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

यापूर्वी हा पुरस्कार सूर्यकांत भिसे (पुण्यनगरी), शंकर टेमघरे (सकाळ), मनोज मांढरे (प्रेस फोटोग्राफर), राजेंद्रकृष्ण कापसे (सकाळ) आणि सुनील लांडगे (महाराष्ट्र टाइम्स) यांना प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, “भागवत धर्म प्रसारक” पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार, वारकरी व विविध क्षेत्रांतून शहाजी फुरडे-पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई मठात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

Post Views: 107
Previous Post

आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दिग्गज संघांची विजयी सलामी!

Next Post

खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
खरीप पिकांच्या ‘एमएसपी’ वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

खरीप पिकांच्या 'एमएसपी' वाढीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा-हेंमत पाटील 

ताज्या बातम्या

आदिला नदी की नाला चर्चेचा विषय नाही खोलीकरण करून पाण्याची विल्हेवाट लावू जयकुमार गोरे #news

August 16, 2026

शहराच्या विकासात कोणीही आडवा आला तरी बीओटी प्रकल्प करणारच पालकमंत्री जयकुमार गोरे #news

August 16, 2026

बालाजी सरोवरच्या पाचव्या मजल्यावर काय चालते हे तपासून पाहावे पालकमंत्री जयकुमार गोरे #news

August 16, 2026

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला #news #solapurnews

August 16, 2026

शहराबाहेरून दोन रेल्वे लाईन मंजूर #viral #news #solapurnews

August 16, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केले ध्वजारोहण #news

August 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई बसेस उदघाटन

August 16, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनही झाले तिरंग्या वेशभूषेत #news #viral #marathinews

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1073656

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!