बाऱ्हाळी / नांदेड – बाऱ्हाळी येथील सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी व्यंकट गोविंदराव उमाटे तर व्हाईस चेअरमनपदी सौ. मिनाक्षी राजेश्वर तोटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे, भाजपचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, धोंडीराम पाटील अस्वले, व्हाईस चेअरमन व्यंकट पाटील उमाटे आदींच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांची पुढील कार्यकारिणी बिनविरोध यशस्वी करण्यात आली आहे. संस्थेच्या चेअरमन पदी व्यंकटराव गोविंदराव पाटील उमाटे तर व्हाईस चेअरमन पदी सौ. मीनाक्षी राजेश्वर तोटकर यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे. नूतन सदस्य पदी व्यंकटराव ऊर्फ राजन देशपांडे, व्यंकटराव उमाटे, शिवशंकर पाटील, हणमंत पाटील अस्वले, धोंडीराम पाटील अस्वले, प्रकाश पाटील थोटवाडी, केशव पाटील इंगळे, बालाजी सोमवार, प्रकाश भंगे, शेषराव राठोड, वैजनाथ गव्हाणे, सौ. मिनाक्षी तोटकर, सौ. मीनाताई अशोक पंचगटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे मावळते चेअरमन राजन देशपांडे, व्हाईस चेअरमन व्यंकटराव पाटील उमाटे व संचालकांचा सत्कार करून नवनिर्वाचित कार्यकारणीचे सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
नवनिर्वाचित संचालक मंडळाचे माणिकराव देशमुख, श्रीमती विजयाताई देशपांडे, जयप्रकाश देशमुख, मुरारजी देशपांडे, मल्हारराव देशपांडे, अरुण महाजन यांच्या आदींनी अभिनंदन केले आहे.


















