पिलीव – माळशिरस तालुक्यातील कायम स्वरूपी दुष्काळी पट्ट्यातील गावातील गावांना ताबडतोब पाणी मिळावे यामध्ये माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी व कारंडे या मुळ प्रकल्पातील गावाचे चार किलोमीटरचे टेंडर निघाले आहे तर राहिलेली जी पिंपरी, गिरवी ते मोटेवाडी पर्यंतच्या गावासाठी ताबडतोब टेंडर काढावे तर कारंडे येथुन जी उपसा सिंचन योजना आहे जिचा शासनाने 76 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन सर्व्हे पुर्ण झाला आहे या उपसा सिंचन योजनेतील कारंडे ,कोथळे पासुन कोळेगाव, बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी या सर्व उपसा सिंचन योजनेतील 16 गावांसाठी पंप हाऊस सहीत ताबडतोब टेंडर काढावे या मुख्य दोन्ही मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवराज पुकळे यांनी अकरा हजार सहयांची मोहीम हाती घेतली असुन ती प्रकिया अंतीम टप्प्यात असुन या मोहिमेला प्रत्येक गावातून प्रचंड मोठा प्रतिसाद भेटत आहे.
सदरच्या अकरा हजार सहयांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंञी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांना देण्यात येणार आहे.
या दुष्काळी पट्ट्यातील गावांना हे सध्याचे देवेंद्र फडणवीस सरकारच पाणी देऊ शकते .नाहीतर देश स्वातंत्र्य झालयापासुन दुसऱ्या सत्तेतील सरकारने याचा फक्त राजकारणासाठी आजपर्यंत उपयोग केला आहे.असेही यावेळी बोलताना शिवराज पुकळे यांनी सांगीतले.

























