Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विजापूर रोडवर आयटीआयनजीक अतिक्रमण विरोधात धडाकेबाज कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
January 31, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज सलग दुसऱ्या दिवशी बेधडक कारवाई करत विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संरक्षक भिंती लगतची सर्व अतिक्रमणे हटवली. जेसीबीच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात येथील तब्बल 50 खोके आणि पत्रा शेडची दुकाने जागेवरच निष्काशित करण्यात आली. 

         विजापूर रोडवरील आयटीआयच्या संरक्षण भिंती लगत परिसरात अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. या कारवाई संदर्भात उपजिल्हाधिकारी, आयटीआय प्रशासनाने पत्र दिले होते.  तसेच नागरिकांकडून मिळालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने ही मोहीम हाती घेतली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

        या ठिकाणी काल गुरुवारी कारवाई करण्यात आली होती. येथील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी 24 तासाची मुदत कालच दिली होती. या दरम्यान काही जणांनी खोकी वगैरे साहित्य काढून घेतले होते. त्यानंतर पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी सलग येथे ही मोहीम राबवण्यात आली. आज शुक्रवारी सकाळीच अकरा वाजता सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथक या ठिकाणी दाखल झाले. आयटीआयजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेले सर्व खोके, लोखंडे छत, पत्रा शेड अशी सुमारे 50 दुकाने निष्काशीत करण्यात आले. कॅन्टीन, चिकन, गॅरेज यासह विविध व्यवसायाची दुकाने काढण्यात आली. हा संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला. सर्वात मोठी ही कारवाई राबविण्यात आली, असे महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले. 

        शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन करून पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

तब्बल चार तासानंतर झाली मोहीम फत्ते

विजापूर रोडवरील आयटीआयच्या संरक्षक भिंती लगत असलेली अतिक्रमित सर्व खोकी व इतर पत्रा शेड काढण्याची मोहीम सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असे एकूण चार तास राबविण्यात आली. अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे हे या ठिकाणी तळ ठोकून उपस्थित होते. तब्बल चार तासानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या कारवाईमुळे विजापूर रोडवरील वाहतूक सुरळीत झाली असून पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत केले.

कारवाईवेळी अशी होती यंत्रणा तैनात 

या ठिकाणी कारवाईदरम्यान 2 जेसीबी, डंपर यासह मंडई, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी तैनात होते. त्याचबरोबर पोलीस आणि बीट मार्शल असा बंदोबस्त होता. सतत कारवाई झाल्याने एका जेसीबीचा पाईप तुटला. यामुळे दुसरा जेसीबी मागवावा लागला, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.

Post Views: 40
Previous Post

नगरसेवक चेतन नरोटे यांची गटनेतेपदी निवड

Next Post

भक्ती आणि निसर्गाचा संगम: वैरागच्या संतनाथ महाराजांचे ‘तपोवन’ आता प्रकाशात!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भक्ती आणि निसर्गाचा संगम: वैरागच्या संतनाथ महाराजांचे 'तपोवन' आता प्रकाशात!

ताज्या बातम्या

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

April 19, 2026
अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

April 19, 2026
मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

April 19, 2026
डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

डॉ. सतीश कोपुरवाड सोलापूरचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी

April 19, 2026
महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

महात्मा बसवेश्वरांनी केली स्त्री स्वातंत्र्याची सुरुवात – चाकोते

April 19, 2026
अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

अक्षय तृतीया दिवशी बसवेश्वर यात्रा होणार

April 19, 2026
भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

भंडीशेगाव व रोपळे मंडळात १ हजार ६०६ दाखले सेवांचे वितरण – तहसीलदार लंगुटे

April 19, 2026
भव्य रोजगार मेळावा संपन्न

भव्य रोजगार मेळावा संपन्न

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0818253

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697