Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उजनी धरणातून सायंकाळी ७ वाजल्यापासून २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
July 27, 2026
in west maharashtra
0
उजनी धरणातून सायंकाळी ७ वाजल्यापासून २५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या वरच्या तसेच उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वेगाने वाढत असल्याने पूरनियंत्रणाच्या दृष्टीने सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजल्यापासून उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात २५,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग कायम राहिल्यास परिस्थितीनुसार या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे.
सायंकाळी ६.०० वाजताच्या नोंदीनुसार उजनी धरणाची पाणीपातळी (RWL) ४९६.७३० मीटर इतकी झाली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ३२८६.५४ दशलक्ष घनमीटर (११६.०५ टीएमसी) असून, उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा १४८३.७३ दशलक्ष घनमीटर (५२.३९ टीएमसी) इतका आहे. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ९७.७९ टक्क्यांवर पोहोचला असून धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र ३३३.५० चौ.कि.मी. इतके नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, दौंड नदी मापन केंद्रावरून उजनी धरणात ६५,०८४ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून नदीची पाणीपातळी ५०१.४५० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेला विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील सततचा पाऊस यामुळे उजनी धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
सध्या भीमा नदीपात्रात २५,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्याचबरोबर सीना–माढा उपसा सिंचन योजनेस २८० क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेस ९० क्युसेक्स, भुयारी बोगद्यातून ९०० क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून २,४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
वाढत्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीकाठावरील शेतीपंप, वाहने, जनावरे, शेतीची अवजारे व इतर मौल्यवान साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच लहान मुलांना नदीकाठावर जाऊ देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी ही माहिती देताना सांगितले की, धरणातील पाण्याची आवक पुढील काही तासांतही कायम राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Post Views: 4
Previous Post

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next Post

कोळेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या स्वाक्षऱ्यांची होणार पडताळणी; ३० जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कोळेगावमध्ये दारूबंदीसाठी महिलांच्या स्वाक्षऱ्यांची होणार पडताळणी; ३० जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

July 27, 2026
उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

उजनीचे पाणी इंगळगी-शिरवळ धुबधुबी तलावात सोडा!

July 27, 2026

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ‘लिटल चॅम्प’ क्रिकेट स्पर्धेचा दिमाखात बक्षीस समारंभ उत्साहात

July 27, 2026
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संचालकपदी पाचजण बिनविरोध

July 27, 2026

सोलापूर जिल्हा ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स २ व ३ ऑगस्टला

July 27, 2026

अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप खपवून घेणार नाही : आनंदराज आंबेडकर

July 27, 2026
ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

ॲड. पांडुरंग घोलप यांची युवासेना सोलापूर ग्रामीण (मोहोळ-बार्शी) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

July 27, 2026

आषाढी यात्रेच्या काळात तात्काळ उपचारामुळे हृदयविकाराच्या झटका आलेल्या ६ वारकऱ्याना मिळाले जीवनदान

July 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1004570

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!