Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : एल निनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील सुमारे ८० ते ८५ टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. पुढील पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पुढील वर्षभर जिल्ह्यात पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागामार्फत शासनास सादर करावा, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
नियोजन समिती सभागृहात आयोजित टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, राजू खरे, नारायण पाटील, अभिजीत पाटील, उजनी धरण व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता सुभवेन्द्र खांडेकर, भीमा कालवा व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन नियोजन*
पालकमंत्री गोरे यांनी जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती जाणून घेतली. जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनीही पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेताना पिण्याच्या पाण्याची गरज आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा समतोल राखावा. शेतकरी व प्रशासन यांच्यात योग्य समन्वय ठेवावा. जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती दर्शविणारा माहितीपत्रक अथवा चार्ट उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
*टँकर मंजुरीसाठी ४८ तासांची कार्यवाही*
टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रस्तावाला ४८ तासांच्या आत मंजुरी मिळेल, याबाबत दक्षता घ्यावी. तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांनी टँकरबाबत गावनिहाय योग्य नियोजन करावे. जिल्हा परिषद स्तरावर टँकर व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करून प्रत्येक टँकरच्या फेऱ्या, पाणीपुरवठा आणि खर्चाचा योग्य हिशोब ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास दररोज आणखी गावांकडून टँकरची मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य परिस्थितीचा विचार करून आधीच नियोजन करावे. टँकर सुरू करण्याबाबतची कार्यवाही वेळेत होते की नाही, याची जबाबदारी संबंधित प्रांताधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धतेचे नियोजन*
जिल्ह्यातील जनावरांसाठी आवश्यक पाणी व चारा उपलब्ध राहील, याचेही नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री गोरे यांनी दिल्या. यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. तहसीलदार, प्रांताधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी टंचाईच्या अनुषंगाने सादर करावयाचे अहवाल वस्तुनिष्ठ व अचूक पद्धतीने सादर करावेत. दुष्काळसदृश परिस्थितीत एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
*जिल्हा 27 लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध*
जिल्ह्यात १८ लाखांपेक्षा अधिक पशुधन असून सुमारे २७ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. चारा पिकांच्या पेरणीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यापैकी प्रारंभी २ कोटी रुपयांच्या निधीतून चारा पिकांची पेरणी करण्यात आली आहे. मागील महिन्यात अतिरिक्त १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन करावे, असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहनही पालकमंत्री गोरे यांनी केले.
सप्टेंबरपर्यंतच्या पाणीटंचाईचा आराखडा तयार
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणी उपलब्धतेबाबत माहिती दिली. एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उजनी धरण भरल्यानंतर उपलब्ध अतिरिक्त पाणी जिल्ह्यातील काही लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सोडण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंतच्या संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. पाणी व चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उजनी धरणातील पाणीसाठ्याचा आढावा
उजनी धरण व्यवस्थापनाचे अधीक्षक अभियंता सुभवेन्द्र खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती व सिंचन नियोजनाची माहिती दिली. उजनी धरणात सद्यस्थितीत सुमारे ९५ टक्के पाणीसाठा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १५ ऑक्टोबरपर्यंत खरीप हंगामासाठी सिंचनाचे रोटेशन सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
*लोकप्रतिनिधी यांच्या सूचना*
बैठकीत लोकप्रतिनिधींनी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. जिल्ह्यातील भीमा व सीना नदीवरील सुमारे ९० कोल्हापुरी बंधाऱ्यांमधून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या पाण्याचे योग्य नियोजन करून पुढील काळात अधिकाधिक पाणीसाठा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी प्राप्त झाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना वेळेत पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही लोकप्रतिनिधींनी केली.
           ********
Post Views: 14
Previous Post

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार

Next Post

रणसम्राट गणेश मंडळांने नागरिकांची आरोग्य तपासणी करुन दिला आरोग्यदायी दिलासा 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
रणसम्राट गणेश मंडळांने नागरिकांची आरोग्य तपासणी करुन दिला आरोग्यदायी दिलासा 

रणसम्राट गणेश मंडळांने नागरिकांची आरोग्य तपासणी करुन दिला आरोग्यदायी दिलासा 

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243161

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!