सोलापूर : मानवी जीवनात भाषा हे प्रभावी संवादाचे माध्यम असते. यातून दैनंदिन जीवनव्यवहार गतिमान राहतो. परंतु भाषेचा विकास करायचा असेल तर त्यातून विविध ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला मोठा अभिजात वारसा आहे. तो पुढे घेऊन जाताना तिला डिजिटल माध्यमांशी जोडणे गरजेचे आहे, असे विचार प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी मांडले.
संगमेश्वर काॅलेमधील मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ कार्यक्रम ते बोलत होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताह निमित्त ‘अभिजात मराठी ‘ भित्तीपत्रिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. बुवा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा अभिजात वारसा सांगितला. सोलापूर ही भाषा, साहित्य व कलेचे विविधांगी दर्शन घडविणारी नगरी आहे. यामध्ये संगमेश्वर काॅलेजचा महत्त्वाचा सहभाग आहे.
प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सारीपुत्र तुपेरे यांनी केले. त्यामध्ये त्यांनी मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताह’ साजरा केला जात असून ६ आॅक्टोबर रोजी शिंगापूर येथील लेखिका मोहना कारखानीस याचे दूरभाष चित्रप्रणालीच्या माध्यमातून विशेष व्याख्यान, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन प्रा. राधिका शिंदे यांनी तर आभार प्रा. संगीता मोहिते यांनी मानले. याप्रसंगी प्रा. सतीश हेगडे, डॉ. लतिका कट्टीमनी, डॉ. संघप्रकाश दुड्डे, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. अण्णासाहेब साखरे, डॉ. दादासाहेब खांडेकर, प्रा. संतोष पवार, डॉ. रेवणसिध्द हल्लोळी, डॉ. भाग्यश्री पवार, प्रा. सुजाता गदवालकर , डॉ. युवराज सोलापुरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
Post Views: 7