Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विकासाचे मॉडेल समोर ठेवून काम करणार; भाजपचे महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल यांची ग्वाही

तरुण भारतbyतरुण भारत
February 3, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 सोलापूर : महापौर झाल्यावर आपण विकासाचे मॉडेल समोर ठेवून काम करणार आहोत. पाणी, रस्ते, स्वच्छता, उड्डाणपूल, आयटी पार्क, रोजगार निर्मिती  आदींचे व्हिजन राहणार असून त्यावर आपण भर देऊ, अशी ग्वाही भाजपचे महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महापालिकेत पत्रकारांशी बोलताना दिली. 

         महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, भाजपचे गटनेते नरेंद्र काळे, महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, उपमहापौरपदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कोंड्याल यांनी सांगितले की, सोलापूरकरांनी महापालिका निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान केले आहे. सोलापूरकरांनी दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवू.

अनुभवाच्या निकषावर कोंड्याल यांना महापौरपद : रोहिणी तडवळकर

महापौरपदाची निवड कोणत्या निकषावर केली या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या की, सभागृह चालवणे, कामकाज कसे चालते याची माहिती, नगरसेवकपदाचा अनुभव या निकषावर विनायक कोंड्याल यांना उमेदवारी दिली आहे. ज्ञानेश्वरी देवकर यांना सुशिक्षित महिला असल्याने चांगल्या पद्धतीने कामकाज सांभाळतील. या मुद्द्यावरून उपमहापौर पदाची उमेदवारी दिली आहे. सर्व समाजांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला उपमहापौर देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजाला पुढील अडीच वर्षांनी चिट्ठी निघाल्यावर महापौरपदाची संधी मिळाल्यास नक्कीच न्याय देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

डॉ. किरण देशमुख यांना महापौरपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : तडवळकर      

महापालिका निवडणुकीत डॉ. किरण देशमुख यांनी पक्षाकडे नगरसेवकपदासाठी मागणी केली नव्हती, तरीदेखील आम्ही त्यांना नगरसेवकपदाची उमेदवारी दिली. महापौरपदाबाबत त्यांनी इच्छा व्यक्त केली नव्हती, त्यामुळे त्यांना महापौरपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरादाखल सांगितले. व्हीप बजावूनदेखील आजच्या बैठकीला जे नगरसेवक अनुपस्थित आहेत, त्यांचा अहवाल आपण प्रदेशला कळविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.     

सभागृहाचा कारभार आदर्श पद्धतीने चालवणार : नरेंद्र काळे 

भाजपनेते गटनेते अर्थात महापालिकेचे भावी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सांगितले की, यंदा महापालिकेत सत्ता स्थापन करताना भाजपसमोर कुठलेही आव्हान नाही. सभागृहाचे कामकाज आदर्श पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न राहील. शहराच्या विकासाबाबत विरोधक ज्या सूचना करतील त्या विचारात घेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शहर विकासासाठी जिथे निधीची आवश्यकता आहे तिथे पूर्तता करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पदाचा उपयोग सर्वांगीण विकासासाठी करणार : ज्ञानेश्वरी देवकर 

उपमहापौरपदाचा वापर आपण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करणार आहोत, अशी ग्वाही भाजपच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली उपमहापौरपदाची संधी दिल्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार सुभाष देशमुख, मनीष देशमुख यांचे आभार मानले.

Post Views: 50
Previous Post

सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

Next Post

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर  कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर  कारवाई

ताज्या बातम्या

वांगचुकने केले वंदे भारतचे तोंड भरून कौतुक

July 31, 2026

महाराष्ट्र कर्नाटकाचा संपर्क तुटला

July 31, 2026

एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 10 जखमी

July 31, 2026

अजिंक्य राहणे यांची निवृत्ततिची घोषणा ,करताना झाले भावनिक….

July 31, 2026

तुंगारेश्वर धबधब्यातून मानवी साखळी करून बाहेर पडले पर्यटक

July 31, 2026

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहोळ तालुक्यातील बनावट देशी दारू कारखान्यावर केली धडक कारवाई……

July 31, 2026

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015549

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!