राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते, ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नजीब मुल्ला यांना नियुक्तीपत्र प्रदान करत असताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभाशीर्वादाने, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार. सुनिलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील नजीब मुल्ला यांचा वावर, तळागाळातील माणसांशी जोडलेली नाळ, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या निरीक्षकपदी नजीब मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा उंचवाल या अपेक्षेसह पुढील प्रगतीशील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केले आहे.