Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ST सुस्साट ! महामंडळाचा मागील वर्षभराच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातला तोटा 10 कोटींवर….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 16, 2023
in maharashtra
0
ST सुस्साट ! महामंडळाचा मागील वर्षभराच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यातला तोटा 10 कोटींवर….
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘गाव तेथे एसटी’ असं ब्रीद कायम ठेवताना आर्थिक अडचणींनादेखील एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. एसटी संपानंतर पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आलेल्या एसटी समोर आर्थिक अडचणी कायम होत्या. मागील वर्षभरापासून तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता लवकरच फायद्यात येण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचा हा तोटा अगदी दहा कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. मागील वर्षात एसटी महामंडळाला 4000 कोटींचा तोटा झाला होता. त्याच्या तुलनेत, यंदाच्या मे महिन्यात तोटा हा सरासरी 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 4000 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे एसटी महामंडळ पुन्हा फायद्यात येणार की नाही याची चर्चा जोरदार सुरू होती. एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. अजित पवार अर्थमंत्री असताना महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. यंदा मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत एका महिन्याचा तोटा हा 10 कोटींवर आला असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिवसेंदिवस वाढत जाणारा तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाला खऱ्या अर्थाने राज्य सरकारच्या मदतीची गरज होती. दरम्यानच्या काळात एसटीने प्रवास करण्यापेक्षा खाजगी वाहनांना प्रवास करण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत होता. मात्र त्यावेळी नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आणि याचा फायदा एसटी महामंडळाला झाल्याचे पाहायला मिळालं. राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या योजनेतील प्रवास शुल्काची प्रतिपूर्ती होत असल्याने आणि मिळणारी आर्थिक मदत याचा एसटी महामंडळाला मोठा आधार मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के आणि 75 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना 100 टक्के प्रवासात तिकीटात सवलत दिली. तर महिलांना थेट 50 टक्के एसटी भाड्यात सवलत दिली, त्याचा फायदा होताना दिसत असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी म्हटले.

विविध योजनेतून महामंडळाला मिळालेला फायदा

> 75 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास या योजनेसाठी सरकारकडून मिळालेली रक्कम 91 कोटी रुपये

>  महिलांना 50 टक्के तिकीट सवलत योजनेसाठी सरकारने प्रतिपूर्तीसाठी दिलेली रक्कम – 179 कोटी रुपये

> 65 ते 75 वय असलेल्या नागरिकांना 50 टक्के सवलत योजनेसाठी सरकारने दिलेली रक्कम 26 कोटी रुपये

एसटी महामंडळाचे 18 विभाग फायद्यात

एसटी महामंडळाचे राज्यातील 31 विभागांपैकी 18 विभाग सध्या फायद्यात आहेत. यामध्ये बीड पहिल्या क्रमांकावर असून परभणी दुसऱ्या आणि जळगाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीड विभागाला मे महिन्यात साडेतीन कोटी रुपये परभणी विभागाला तीन कोटी रुपये आणि जळगाव विभागाला दोन कोटी 90 लाख रुपयांचा फायदा झाला आहे. पुढील महिन्यात हीच रक्कम आणखी वाढेल असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांना आहे.

शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले या दोन महत्त्वाचे निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याचे पाहायला मिळत असल्याचे बोललं जात आहे. आज घडीला एसटी महामंडळ तब्बल 4000 कोटी रुपये तोट्यातून थेट दहा कोटी रुपये तोट्यावर आला आहे. यामुळे आता पुढील काळात एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून पगारासाठी पैसे घेण्याची देखील गरज उरणार नसल्याची शक्यता महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post Views: 88
Previous Post

अजितदादांनी भर सभेत सांगितलं बारामती जिंकण्याचं गणित…!

Next Post

वारी विठ्ठालाची मग गजर ‘ज्ञानबा- तुकारामा’चा का? काय आहे ही प्रथा..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वारी विठ्ठालाची मग गजर ‘ज्ञानबा- तुकारामा’चा का? काय आहे ही प्रथा..

वारी विठ्ठालाची मग गजर 'ज्ञानबा- तुकारामा'चा का? काय आहे ही प्रथा..

ताज्या बातम्या

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले

July 30, 2026

आसामच्या पुरात जीवावर खेळ बाबाने वाचविले तीन बाळांचे प्राण

July 30, 2026

बोलले असे की झाला नेटकर्यांचा हल्लाच

July 30, 2026

विरोधकांना चक्क शब्दाने झोडपले

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013718

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!