Sunday, May 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 23, 2023
in maharashtra
0
कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हयामध्ये परीसरातील कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना राबवण्यात येतात.या योजना ह्या प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. रायगड- अलिबाग जिल्हयातील १४ तालुक्यांमध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे ही योजना २०१७-१८ पासून राबवण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाने परिपरित केलेल्या अर्जाचा नमूना तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे उपलब्ध राहील. निवड केलेल्या लाभार्थीना हा प्रकल्प ३ वर्ष कार्यान्वित ठेवणे बंधनकारक राहील. निवड केलेल्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे कुक्कुट पालन विषयक प्रशिक्षण व खाजगी अंडी उबवणूक केंद्र, शासकीय अंडी उबवणूक केंद्र, लघु अंडी उबवणूक यंत्राचा वापर करीत असलेल्या प्रक्षेत्रावर भेटीचा समावेश आहे. लाभार्थी निवड ही जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णया प्रमाणे सात सदस्यांच्या गठीत समिती पुढे निवड केली जाणार आहे.

लाभार्थी निवड साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपाय योजना व जनजाती क्षेत्र उपाय योजनेतील जे लाभार्थी सद्य स्थितीत कुक्कुट पालन व्यवसाय करत आहेत, तसेच ज्या लाभार्थ्यांकडे अंडी उबवणुकीचे यंत्र आहे. अशा लाभार्थीना प्राधान्य राहील. ३०% महिला लाभार्थीना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात जिल्ह्यामध्ये २०१८-१९ या वर्षामध्ये पाच व २०१९-२०२० ला पाच व २०२०-२१ ला चार असे वर्षनिहाय एकूण १४ विकास गटांची स्थापना करण्याचे आहे. निवडलेल्या तालुक्यात प्रति तालुका एक लाभार्थी निवडला जाईल.

या योजनेंतर्गत निवडलेल्या लाभार्थीकडे २५०० चौ. फुट जागा स्वतःच्या मालकीची असावी. त्या ठिकाणी दळणवळण, इलेक्ट्रिसीटी, पाण्याची सोय उपलब्ध असावी. या योजनेचे अनुदान एकदाच देय असून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे. या योजनेंतर्गत १००० चौ. फुट पक्षीगृहाचे बांधकाम खात्याने ठरवून दिलेल्या मोजमपा प्रमाणे असणे आवश्यक आहे. लाभार्थीने लघु अंडी उबवणूक यंत्राची खरेदी करताना १००० अंडी उबविण्याची क्षमता व १४ के व्ही. ए. क्षमतेचा डिझेल अथवा गॅसवर चालणारे जनरेटर यंत्र असावे. यंत्राची उभारणी व कनेक्शन व दोन वर्षाची वॉरंटी, अंडी उबवणूक यंत्र उत्पादकाकडून लाभार्थीस प्रशिक्षण दिलेले असावे. प्रकल्प उभारणी नंतर योजनेमध्ये समाविष्ट तपशीलची पडताळणी नेमून दिलेल्या अधिकाऱ्या मार्फत करण्यात येईल.

निवड झालेल्या लाभार्थीने मान्यताप्राप्त एक दिवशीय मिश्र पिल्ले २० आठवडे वयावरील अंड्यांवरील पक्षी, सघन कुक्कुट गट, अंडी, यांची खरेदी सघन कुक्कुट विकास गट / मध्यवर्ती व इतर शासकीय निमशासकीय संस्था कडून जिल्हा स्तरीय निवड समितीच्या शिफारशीने खरेदी करणे बंधनकारक राहील. खरेदीच्या पावल्या, डिलेव्हरी चलन यांची पडताळणी केल्यानंतरच अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्या मध्ये जमा करण्यात येईल. सुरुवातीस आवश्यक लघु अंडी उबवणूक केंद्रास लागणारी अंडी शासकीय संस्थेकडून खरेदी करणे बंधनकारक राहील. तदनंतर लाभार्थीने स्वतःच्या प्रक्षेत्रावर उत्पादित उबवणुकीच्या अंड्यांचा वापर करून पिल्ले निर्मिती करणे आहे.

योजनानिहाय निश्चित किंमत पुढीलप्रमाणे आहे. जमीन व खोल्या लाभार्थीच्या या योजने अंतर्गत जमीन २५०० चौ. फूट, (१००० चौ. फुटाचे २ शेड) खाद्य, अंडी, साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतःच्या मालकीच्या स्वतंत्र खोल्या साठी एकूण अंदाजित किंमत सध्या निरंक निश्चित करण्यात आली आहे.

प्रति १००० चौ. फुटाचे २ पक्षी गृहाचे बांधकाम, स्टोअर रूम, पाण्याची टाकी व विद्युतीकरण यासाठी या योजने अंतर्गत एकूण अंदाजित किंमत ४ लाख रुपये आहे. खाद्य व पाण्याची भांडी, ब्रडर, इतर उपकरणे व लसीकरण या योजने अंतर्गत शासन व लाभार्थी सहभाग ५० हजार रुपये. अंडी उबवणूक यंत्र (Mini Setter cum Hatcher) एकूण अंदाजित किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. १००० एकदिवसीय मिश्र (नर मादी) पिले व प्रति पक्षी रु.६०/- या योजने अंतर्गत रु. ६०,०००/-, २० आठवड्यांची अंड्यावरील ५०० पक्षी (नर मादी) प्रति पक्षी १५०/- या योजने अंतर्गत रु.७५,०००/-, १००० एकदिवसीय पिलांसाठी २० आठवडे कालावधी पर्यंत पक्षी खाद्य पुरवठा (प्रति पक्षी एकूण ८.५० कि.ग्रॅम खाद्य प्रति किलो रु. २५/- दराने) रु.१,१२,५००/-, एग नेस्ट्स रु.३०,०००/- पक्षी खाद्य ग्राईंडर (सिंगल फेज) रु.१६,०००/- असे एकूण किंमत रु.१०,२७,५००/- रुपये असून शासन व लाभार्थी यांचा सहभाग राहिल. सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% अनुदान म्हणजेच रु. ५,१३,०००/- शासनाचे अनुदान देय राहील.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांनी शासन निर्णय क्र. कुक्कुट २०१७/प्र.क्र.६७/पदुम-४, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक. १३ नोव्हेंबर, २०१७ व मार्गदर्शक सूचना जा.क्र. कुक्कुट-२/५४२८/पीपीपी मॉडेल / २०१७, पसं१३, पुणे ६७, दिनांक- २३/११/२०१७ नुसार अर्ज करावा, सूचना व योजनेच्या अंमलबजावणी बाबत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड, सुधागड पाली, कर्जत, अलिबाग या तालुक्यातून पुरेसा प्रतिसाद अद्याप पर्यंत न मिळाल्याने या योजनेसाठी नव्याने अर्ज मागवण्यात येत आहेत. या सहा तालुक्यातून प्राप्त अर्जातून प्रत्येकी एका लाभार्थ्याची जिल्हा निवड समिती मार्फत निवड करण्यात येईल. सूचना व योजनेच्या अंमलबजावणी बाबत तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

Post Views: 137
Previous Post

नागपूर : ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Next Post

मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद

मराठी चित्रपटात झळकणार विनय आनंद

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0887499

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697