Sunday, June 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निखत झरीनला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 27, 2023
in sports
0
निखत झरीनला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण…..
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
नवी दिल्ली येथे सुरू असललेल्या महिला वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या निखत झरीनने सुवर्णपदक पटकावलं आहे.निखतने 26 मार्च झालेल्या सामन्यात व्हिएतनामच्या एनगुयेन थी तॅम हिचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. या निमित्ताने निखत झरीनने महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत असल्याचं दिसून येतं.
निखत झरीन हिचा आजवरचा प्रवासही अत्यंत रंजक आहे. जाणून घ्या तिच्या कारकिर्दीविषयी – स्वतःच्या हक्कांसाठी मेरी कोमशी भिडली होती निखत ट्विटरवर ट्रेंड होत असल्यामुळे निखत आज खूप खूष आहे. आज ती जिंकल्यामुळे ट्विटरवर ट्रेंड होतेय. पण 2019 मध्ये मात्र तिला ट्विटरवर चांगलंच ट्रोल केलं जात होतं.
तेव्हा तिने तत्कालीन क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्याकडे सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोमबरोबर तिची एक मॅच खेळवली जाण्याची मागणी केली होती. टोकिओ ऑलिम्पिकला क्वॉलिफाय होण्यासाठी ही मॅच होती.
ही मॅच झाली आणि निखत मेरी कोमबरोबर 1-9 ने हारली. या मॅचनंतर मात्र मेरी कोमने निखतशी हात मिळवणंसुद्धा टाळलं होतं. ही मॅच सपाटून हारल्यानंतर तिला ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
भारतीय महिलांचा बोलबाला
निखत झरीनचा विजय मोठा मानला जातो कारण भारताला आतापर्यंत एकूण दहा सुवर्णपदकं मिळाली आहेत. दहा पैकी सहा पदकं एकट्या मेरी कोमने मिळवली आहेत.
मेरी कोम ने 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 मध्ये झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं होतं. तर इतर चार सुवर्णपदकांपैकी एकट्या 2006 साली भारताकडे तीन सुवर्णपदकं आली होती. सरिता देवी, जेन्नी आर. एल. आणि लेखा केसी यांनी ही पदकं मिळवली होती.
वुमन बॉक्सिंगचा 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रीडा प्रकार म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र हा समावेश होण्याआधीच दहा पैकी आठ सुवर्णपदकं भारताकडे आली होती. त्यातील पाच पदकं एकट्या मेरी कोमने मिळवली होती. मेरी कोमने ऑलिम्पिक काळात 2018 मध्ये एक सूवर्ण पदक मिळवलं होतं.
2012 मध्ये मेरी कोमला सुवर्णपदक मिळवण्याची चांगली संधी होती. मात्र 2011 ते 2016 मध्ये ग्रेट ब्रिटनच्या निकोला अडम्सने तिचा सातत्याने पराभव केला. निकोला अडम्सला 2012 आणि 2016 मध्ये सुवर्णपदक मिळालं होतं.
मेरी कोमने जेव्हा 2018 मध्ये जेव्हा सुवर्ण पदक मिळवलं तेव्हा ती कुठेही त्या पदकाच्या शर्यतीत नव्हती. या सर्व कारणामुळे निखत झरीन यांचा विजय आणखी अधोरेखित होतो. मेरी कोमलाही 2012 मध्ये अशीच संधी होती.
“अंतिम सामना अतिशय आव्हानात्मक होता. पण मी इथे जे करायला आली होती ते मिळालं आहे त्याचा फार आनंद आहे,” अशी प्रतिक्रिया निखत झरीनने बीबीसी तेलुगूशी बोलताना व्यक्त केली आहे.
या विजयानंतर व्हर्च्युलअ माध्यमातून तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, “हा विजय माझ्या आई- वडिलांसाठी आहे. मी जेव्हाही माझ्या आईला फोन करायचे तेव्हा ती नमाज पढत असायची, माझ्या विजयासाठी दुवा मागायची.”
“ही दुवा कुबूल झाली आहे. हा विजय, हे सुवर्णपदक त्यांचं आहे. माझ्या वडिलांनी मला किती पाठिंबा दिला हे मला माहिती आहे. मी माझा विजय त्यांना समर्पित करते. जेव्हा माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा माझ्याबरोबर कुणीही नव्हतं. फक्त माझे कुटुंबीय माझ्या बरोबर होते.”
“माझ्या मार्गात अनेक अडथळे आलेत. त्यांनीच मला लढण्याची ताकद दिली. माझ्या दुखापतींनी मी कणखर झाले. मला कळलं की काहीही झालं तरी मला खेळायचंच आहे. अंतिम सामन्याच्या दिवशी मी जेव्हा झोपेतून उठले तेव्हा मी देवाचा धावा केला. पूर्ण दिवस मी माझ्या खेळाबद्दल विचार केला आणि मी दिवसभर त्यातच होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निखत चं अभिनंदन केलं आहे.
निखत झरीनने वयाच्या बाराव्या वर्षी बॉक्सिंग करायला सुरुवात केली. तिचे आईवडील दोघंही खेळाडू आहे. निखतने सुवर्ण पदक मिळवल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता.
Post Views: 166
Previous Post

LIVE :- सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करतो – मुख्यमंत्री

Next Post

वार्षिक संसदपटूंच्या कार रॅलीच्या 8व्या आवृत्तीच्या पारितोषिक वितरण समारंभ….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वार्षिक संसदपटूंच्या कार रॅलीच्या 8व्या आवृत्तीच्या पारितोषिक वितरण समारंभ….

वार्षिक संसदपटूंच्या कार रॅलीच्या 8व्या आवृत्तीच्या पारितोषिक वितरण समारंभ....

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0897774

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697