Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बीएमसीच्या पुढाकाराने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण सुरू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 24, 2023
in maharashtra
0
बीएमसीच्या पुढाकाराने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण सुरू
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

’रेबिजमुक्त मुंबई’साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर या भटक्या श्वानांच्या गळ्यात ‘क्यूआर कोड’ असलेले ‘कॉलर’ घालण्यात आले आहे. परिणामी, क्यूआर कोड स्कॅन केल्यावर श्वानाच्या माहितीसह त्याला खाद्य देणा-याचा (फिडर) तपशील, लसीकरण, निर्बिजीकरण आणि वैद्यकीय माहिती प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱया रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून २५ जुलै २०२३ रोजी मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. केवळ निर्बिजीकरण, लसीकरण यांवर न थांबता श्वानांच्या आरोग्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आता अत्याधुनिक उपाययोजना राबविणार आहे.

सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. दर दहा वर्षांनी श्वान जनगणना होते. त्यानुसार जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे . त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहिम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा राबता असतो. लाखो प्रवाशांची दररोज ये – जा असते. घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने या परिसरात नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. अनोळखी व्यक्ती दिसल्यावर श्वानांची आक्रमकता वाढते. श्वानदंशांच्या घटनांबरोबरच प्रसंगी उपद्रव वाढतो. या घटना विचारात घेता, भटक्या श्वानांच्या रेबिज लसीकरणाचा पथदर्शी प्रकल्प मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर राबविण्यासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, मंगळवारी, दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी योडा व कॅप्टन इंडिया झिमॅक्स या स्वयंसेवी संस्थांच्या सहायाने २६ श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात आले. तसेच, प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे. या उपक्रमासाठी या दोन्ही स्वयंसेवी संस्था निशुल्क सेवा देत आहेत. भटक्या श्वानांसाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन टॅग’ तयार करण्यात आले असून त्याद्वारे मुंबईतील भटक्या श्वानांची केंद्रीकृत सांख्यिकी माहिती (डेटाबेस) मिळण्यास मदत मिळणार आहे.

Post Views: 90
Previous Post

तुळजाभवानीच्या दागिन्यांची दुसऱ्यांदा मोजणी करण्यात आली आहे. गायब झालेल्या प्राचीन अलंकाराच्या अहवालाची प्रतीक्षा.

Next Post

‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली – फडणवीस

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली – फडणवीस

'ब्लॅक अँड व्हाईट' सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली - फडणवीस

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011550

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!