Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मणिपूर ‘अशांत क्षेत्र’, १ ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी ‘अफ्स्पा’ लागू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 28, 2023
in india
0
मणिपूर ‘अशांत क्षेत्र’, १ ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी ‘अफ्स्पा’ लागू
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे बहुतांश भाग हा ‘अशांत क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या १ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात ‘अफ्स्पा’ (लष्कराचा विशेषाधिकार कायदा) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये ३ मे पासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बुधवारी थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला जमावाने आग लावली. याशिवाय इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत इंफाळ खोऱ्यात झालेल्या निदर्शनांमध्ये ५० जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.

मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर जाळपोळीचे ५,१७२ गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात ४,७८६ घरे आणि ३८६ धार्मिक स्थळांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी १६९७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह बुधवारी विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष विमानाने इंफाळ येथे पोहोचले आहेत.

१९ पोलीस ठाण्यांच्या हद्दी वगळल्या
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सात जिल्ह्यांतील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दी या ‘अशांत क्षेत्रा’तून वगळण्यात आल्या आहेत. यात इंफाळ महानगरपालिकेच्या हद्दीचाही समावेश आहे. अशांत क्षेत्रातून वगळलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत इंफाळ, लेफेल, सिटी, सिंग्जमई, सेकमेई, लामसांग, पत्सोई, वांगोई, पोरोमपट, हेंगेग, लामलाई, इरिलबुंग, लेमखोंग, थोबूल, विष्णूपूर, नांबोल, मोइरोंग, काकचिंग आणि जिरिबम आदींचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून लागू असलेला ‘अफ्स्पा’ १ एप्रिल २०२२ रोजी पंधरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यामुळे पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. राज्यातील बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येमुळे ही स्थिती आणखीनच गंभीर बनली आहे. पोलीस आणि आंदोलक यांच्यात मंगळवारी जोरदार धुमश्चक्री झाली होती. यावेळी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला होता.

इंफाळमध्ये सलग दोन दिवस विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. सरकार आणि यंत्रणेच्या विरोधात घोषणा देत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले. ‘इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम’ (आयटीएलएफ) ही संघटना रस्त्यावर उतरली होती.

दोषींना सोडणार नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हत्येप्रकरणी म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. दोषींना सोडले जाणार नाही. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पदावरून हटवा – मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याबाबत म्हणाले की, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे, राज्यातील लोक गेल्या १४७ दिवसांपासून हिंसाचाराचा सामना करत आहेत, मात्र पंतप्रधानांकडे मणिपूरला जाण्यासाठी वेळ नाही.

Post Views: 106
Previous Post

पुण्यातील मानाचे पाचही गणपती टिळक पुतळ्याजवळ

Next Post

विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत; २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत; २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण

विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत; २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण

ताज्या बातम्या

भवानी पेठेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा रेबीजमुळे मृत्यू #viral #marathinews #solapurnews

July 25, 2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली #viral

July 25, 2026
आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0997783

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!