Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैद्यकीय व्यवसायातील विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासून काम करावे : डॉ. प्रकाश आमटे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2023
in maharashtra
0
वैद्यकीय व्यवसायातील विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्ती जोपासून काम करावे : डॉ. प्रकाश आमटे
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैद्यकीय सेवा ही अत्यंत अत्यावश्यक अशी सेवा आहे. वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समर्पित भावनेने राज्याच्या कानाकोपऱ्यात आवश्यकता असेल तेथे वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. तसेच समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, हे सतत लक्षात ठेवून समाजाकडे चौकस बुद्धीने पाहिलं पाहिजे. येणाऱ्या आव्हानांचा सामना करत आणि धीरोदात्तपणे प्रत्येक संकटाला तोंड देत विद्यार्थ्यांनी आपली सेवाभावी वृत्ती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अन्य मनपा प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येते. याच अंतर्गत दरवर्षी मराठी महिन्यांमधील ‘श्रावण’ महिन्यात ‘श्रावणसरी’ या उत्सवाचे आयोजन केले जाते. यानुसार या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास सांभाळून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

यंदाच्या ‘श्रावणसरी’ उत्सवादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची प्रकट मुलाखत डॉ. शुभम हिरेमठ आणि विद्यार्थीनी भक्ती शिंदे यांनी घेतली. यावेळी बोलताना डॉ. प्रकाश आमटे यांनी सामाजिक क्षेत्रातील आपली वाटचाल आणि प्रवास उलगडून सांगितला. तसेच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तेही गेल्या ३८ वर्षांपासून मराठीचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात याचे कौतुक आणि अभिमान असल्याच्या भावना डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आमटे म्हणाले.

बा.य.ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर म्हणाले की, बा. य. ल. नायर रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ‘उत्सव महाराष्ट्राच्या परंपरेचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘श्रावणसरी’ या दोन दिवसीय उत्सवादरम्यान मराठी भाषेचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याच अंतर्गत मराठी भाषा आणि संस्कृतीची घट्ट नातं असणारी दिंडी आणि इतर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे मराठी भाषेला समर्पित दोन दिवसीय उत्सवाचे आयोजन करणारे नायर वैद्यकीय महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय आहे.

बा. य. ल नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या ३८ वर्षांपासून ‘श्रावणसरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मराठी नाट्य स्पर्धा, काव्य मैफिल, नृत्य स्पर्धा, भजन, गायन यासह विविध अविष्कारातून मराठीचा जागर करण्यात येतो. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान दोन दिवसांमध्ये आहार देखील मराठी पद्धतीचा असतो. यामध्ये पुरणाची पोळी, श्रीखंड, मोदक, झुणका भाकरी असे पदार्थ असतात.

एवढेच नव्हे तर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा पोशाख देखील या दोन दिवसांच्या कालावधीत प्राधान्याने महाराष्ट्रीयन पद्धतीचा असतो. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीच करत असतात. विशेष म्हणजे कार्यक्रमाचा खर्च देखील विद्यार्थ्यांच्या वर्गणीतून करण्यात येतो. यंदा देखील अत्यंत दिमाखात सलग दोन दिवस श्रावण सरी हा उत्सव पार पडला.

दरम्यान भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयात मराठी भाषेचा जागर होणे माझ्यासाठी सुखद धक्का आहे. भाषा, साहित्य आणि कला या तिन्ही बाबींचा संगम या ठिकाणी दिसून आला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अशा कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होतो, असे सांगत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Post Views: 124
Previous Post

केरळचे नाव बदलून ‘केरळम्’ करण्याचा ठराव….

Next Post

सातारा : भीषण अपघातात चौघांचा मृत्यू…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सातारा : भीषण अपघातात चौघांचा मृत्यू…

सातारा : भीषण अपघातात चौघांचा मृत्यू...

ताज्या बातम्या

भारतीय हवाई दलाचे विमान क्रॅश

June 14, 2026

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908977

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697