संपूर्ण महाराष्ट्रात दाक्षिणात्य शैलीतील शिखर असलेले मंदिर फारच क्वचित आढळून येतात. त्यावरील नेत्रदीपक व मनमोहक अशा शिल्प कलाकृती जणू जिवंत कथेचा सारच दर्शवू इच्छितात. अशाच शैलीतील शिखर असलेले एक सुवर्णकलशित मंदिर आहे पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सोलापूर शहरात म्हणजेच पूर्व विभागातील दाजी पेठ स्थित श्रीराम मंदिर…
हे मंदिर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळात १९४३ साली स्थापिले होते. या मंदिराच्या शिखराची उंची हि ३७ फूट असून त्यावर चारी बाजूस प्रभू श्रीरामचंद्रांच्या चारित्र्यावर आधारित ३२० कोरीव मूर्ती व शिल्पाकृती आहेत. संपूर्ण रामायण या कोरीव मूर्तीतून साकारलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिराचे शिखर आहे.
देश-विदेशात नाव लौकिक मिळविलेले तामिळनाडूचे सुप्रसिद्ध वस्तू शिल्पी श्री. के. मारिअप्पा स्थपती यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिखर बनविण्यात आले. जवळपास या ९० वर्ष जुन्या मंदिराचे दाक्षिणात्य शैलीतील शिखर पूर्णत्वास नेण्यास त्याकाळी २ वर्षांचा कालावधी लागला.
Shree Ram Mandir, Daji Peth, Solapur, Maharash


























