बार्शी – एमआयटी संस्थेच्या विश्वस्त तथा महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश जपत एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनीरिंग अँड रिसर्च बार्शी येथे दि.२१ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीयरेड क्रॉस सोसायटी व स्थानिक रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी प्राचार्य डॉ.मधुकर लेंगरे यांनी ‘रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे गरजूचे प्राण वाचू शकतात. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमितपणे रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपावी,’ असे आवाहन केले. शिबिरामध्ये एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रथमच रक्तदान करुन या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला. प्रथमच रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला. रक्तदानातून विद्यार्थ्यांत ‘माझे रक्त, कोणाचे तरी जीवन’ हा मानवतावादी संदेश पोहोचवला. शिबिरासाठी एनएसएस विभाग, आरोग्य समिती, प्राध्यापक, कर्मचारी तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 8