लातूर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सकपाळ नगर येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुरुवातीस इ. चौथी वर्गातील विद्यार्थिनी मानसी शिंदे हिच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर शिंदे, प्रशिक्षिका कनिज फातेमा पठाण मॅडम उपस्थित होत्या.

















