सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर प्रशालेचे सहशिक्षक राजशेखर स्वामी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या न्यायाच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले तसेच आंबेडकरांमुळेच स्त्रियांना व बहुजन समाजाला ज्ञानाचे द्वारे कशी खुली झाली हे सांगत शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे आयुध आहे. या बाबासाहेबांच्या विचारांची आपण नेहमीच प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितलेत.
तसेच बाबासाहेब तर नसते तर या बहुजन समाजाचे काय झाले असते यावर आधारित असलेली प्रा. विनायक पवार यांची एक कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी श्रीनिवास देव्हारे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर सुंदर फुलांची आरास केली होती
या कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर,उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


















