सोलापूर – ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनमार्फत आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी १९ सुवर्ण ७ रौप्य व ८ कांस्य अशी ३४ पदकांची कमाई केली आहे
या कामगिरीवर सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या १७ खेळाडूंची २६ व २७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी (डेरवण) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. जिल्हा स्पर्धेतील पदक विजेत्यांचा सत्कार भाजपा क्रीडा प्रकोष्ठतर्फे करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी होते. तर नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठचे संयोजक यशवंत पाथरूट, व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष जी. के. देशमुख, बिल्डर्स असोसिएशनचे व्हाईस चेअरमन हनुमंत कुलकर्णी, सिनेट सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार अजित संगवे, सिद्धेश्वर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक होरटीकर, विजापूर रोड गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय शाबादे, न्यू जॉगर्स फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप कदम, उपाध्यक्ष विजय झाकणे, सल्लागार विलास राठोड, विराट स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक सूर्याजी लिंगडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू निलेश वरवडकर, उमेश कमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यू जॉगर्स फाउंडेशनचे माजी अध्यक्ष संतोष कदम यांनी सूत्रसंचालन तर विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका भारती लिंगडे यांनी आभार मानले.
——
जिल्हा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू या प्रमाणे :
मोहम्मद सफा खतीब (१०० मीटर, २०० मीटर सुवर्ण), वसंत वाघमोडे (१०० मीटर रौप्य, लाँग जंप रौप्य), विश्वराज जमादार – गोळाफेक सुवर्ण, थाळीफेक रौप्य), आदित्य साठे (१०० मीटर सुवर्ण), हर्षराज फुले(६०० मीटर रौप्य), यशराज पवार (गोळाफेक सुवर्ण), संकेत खटके (गोळाफेक रौप्य, थाळीफेक कांस्य), अनिकेत चव्हाण (लाँग जंप सुवर्ण, ट्रिपल जंप सुवर्ण), सुप्रिया कोळी (भालाफेक रौप्य), अनुजा पांढरे (थाळीफेक सुवर्ण, गोळाफेक कांस्य), पूजा राठोड (१०० मीटर व २०० मीटर सुवर्ण), स्वरा जाधव ( १०० मीटर सुवर्ण, लाँग जंप सुवर्ण), कीर्ती तोळणूर (१०० मीटर अडथळा शर्यत सुवर्ण, १०० मीटर कांस्य, २०० मीटर कांस्य), काशिनाथ चव्हाण ( लाँग जंप कांस्य), सुधीर कोळकुरे (२०० मीटर कांस्य, ४०० मीटर कांस्य), भक्ती थोरात ( १०० मीटर अडथळा शर्यत सुवर्ण, लाँग जंप रौप्य), सृष्टी लिंगडे – ६० मीटर सुवर्ण, ८० मीटर अडथळा शर्यत सुवर्ण), वैष्णवी त्रिमल (भालाफेक कांस्य), संध्या राठोड (१०० मीटर सुवर्ण, लाँग जंप सुवर्ण), विश्वराज गायकवाड (४०० मीटर सुवर्ण).
——





















