बार्शी – शहरातील विठ्ठलनगर परिसरात राहणारी १८ वर्षीय विद्यार्थिनी कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, त्यानंतर ती घरी परत न आल्याने तिच्या वडिलांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तिचा शोध सुरु केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी सुरेश इंगळे (वय १८) ही बी. पी. सुलाखे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ४ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता ती कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतरही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.
यानंतर कुटुंबीयांनी महाविद्यालय परिसर, बार्शी शहरातील विविध ठिकाणे तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर तिचे वडील सुरेश प्रकाश इंगळे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बार्शी शहर पोलिसांनी बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध सुरु केला असून, तिच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्याशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 6