बार्शी – रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने गोवा येथे दि. ५ व ६ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या नॅशनल स्केटिंग स्पर्धेमध्ये बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी (संचलित) विश्वजीत रोलर स्केटिंग क्लब च्या ७ खेळाडूंनी उत्कृष्ट संपादन करुन श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
विजयी खेळाडू पुढील प्रमाणे- श्लोक उकरंडे- गोल्ड मेडल,
आदित्य बागूल- गोल्ड मेडल , आरुष जाधव- गोल्ड मेडल,
अर्णव फल्ले- सिल्व्हर मेडल, धैर्य घोलप- सिल्वर मेडल,
श्रीराज काळे- ब्रांझ मेडल, आरिज बागवान- ब्रांझ मेडल.
वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष/प्रशिक्षक गणेश रोडे, सचिव – सौ.सविता जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच संस्थेच्यावतीने अतुल जाधव, सौ.स्नेहल रोडे, रितेश जानराव, संचिती जाधव, आदित्य माळी, यश नान्नजकर, विश्वजीत जाधव, यशराज रोडे,या सर्व प्रशिक्षकांनी व सर्व पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Post Views: 22