बार्शी – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर श्री. एम. एस. शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर श्री. एस. एस. शिंदे यांचे सहकार्याने, बार्शी तालुका विधी सेवा समिती, बार्शी व वकील संघ बार्शी यांच्या संयुक्त विदयमानाने तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली बार्शी न्यायालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतीत ७८ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी खटले व दाखल पूर्व २३७९ असे एकुण २४५७ इतकी प्रकरणे राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये तडजोडीने मिटवुन त्यात सुमारे प्रलंबित प्रकरणात अनुक्रमे १ कोटी ५१ लाख ६६ हजार १९१ रुपये व दाखलपूर्व प्रकरणांत ७५ लाख ६६ हजार ७४ रुपयांची वसुली झाली. या राष्ट्रीय महालोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७२१ व दाखलपूर्व ६५०४ असे एकुण १०२२५ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये बार्शी न्यायालयातील एकुण चार पॅनल करण्यात आले होते. त्यात जिल्हा न्यायाधीश १ श्री. विक्रमादित्य के. मांडे, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती पी. व्ही. राऊत, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती एच. यु. यु. पाटील, ४ थे सहदिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती आर.पी. बागडे असे एकुण चार पॅनल होते. तसेच २रे सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती जी. एस. पाटील यांचे गुन्हा कबुलीचे विशेष न्यायालय चालु ठेवण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ४. श्रीमती आर. पी. बागडे, सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर यांचे पॅनलसमोर वयोवृध्द पक्षकार सखुबाई शंकर गवळी यांचे तडजोडीकामी न्यायाधीश स्वता दालनाबाहेर गेले व तडजोडीबाबत पूर्तता केली. जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण १ प्रकरण तडजोडीने मिटुन त्यात सुमारे १२ लाख हजार इतक्या रक्कमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ॲक्ट १३८ च्या एकुण १३ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे २० लाख १७ हजार ६०० रुपयांची वसुली तर रक्कम वसुलीच्या १ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात १० लाख १९ हजार ८८१ रुपयांची वसुली झाली. न्यायालयातील प्रलंबित कबुलीची ५७ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ४१ हजार २०० रुपयांची दंड वसुल करण्यात आला. सदर लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये यशस्वी करणेकामी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, सर्व न्यायालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका तसेच फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी, वीज वितरण कंपनी यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले.
फोटो ओळी
दिवाणी प्रकरणातील तडजोडनामा देताना न्यायाधीश व्ही के मांडे, पी.व्ही. राऊत, एच.यु.यु. पाटील, जी.एस. पाटील, आर.पी. बागडे व पक्षकार व विधीज्ञ.

























