पिलीव – माळशिरस तालुक्यातील निरा देवधर मुळ प्रकल्पातील कारूंडे, पिंपरी, लोणंद, रेडे, गिरवी, मांडवे, मांडकी, कण्हेर, इस्लामपूर, भांबुडीॅ, गोरडवाडी, मोटेवाडी या गावांसाठी ताबडतोब टेंडर काढावे .तसेच माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी बचेरी, शिंगोर्णी, सुळेवाडी, कोळेगाव, जळभावी, गारवाड, मगरवाडी, कोथळे, भांब, पठाणवस्ती, तरंगफळ, काळमवाडी, लोंढे मोहीतेवाडी, चांदापुरी, फडतरी, पिलीव या गावांसाठी तातडीने उपसा सिंचन योजनेचे ताबडतोब टेंडर काढावे या मागणीसाठी याच दुष्काळी पट्ट्यातील गावातील अकरा हजार नागरिकांच्या सहयाचे निवेदन शिवराज पुकळे स्वत. या सर्व गावांचा 9 मे ते 14 मे या दरम्यान गावांचा दौरा करुन सह्या घेऊन सदरच्या सहयांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, जलसंपदा मंञी राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास तथा पंचायतराज मंञी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांना देण्यात येणार असल्याचे शिवराज पुकळे यांनी सांगीतले .
यावेळी बोलताना शिवराज पुकळे यांनी मी जरी भारतीय जनता पक्षाचा असलो तसेच माझ्या पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात असले तरीही दुष्काळी भागातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द आपण अजिबात बदलणार नाही .यासाठी सातत्याने मी शासनाकडे पाठपुरावा करुन या भागातील जनतेला हक्काचे पाणी मिळवुन देणारच असल्याचे सांगितले.
_ शिवराज पुकळे
























