सोलापूर : महापालिकेतील कर्मचारी- अधिकारी सेवानिवृत्त सेवक व माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना तीन ३ महागाई भत्त्यात वाढ लागू करण्यात आली आहे. याबाबत महापालिकेचे मुख्यलेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळेकर यांनी आज परिपत्रक काढले आहे. महाराष्ट्र दिनी एक मे रोजी महापौर विनायक कोंड्याल यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महापौर विनायक कोंड्याल यांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात महागाई भत्त्यात वाढ, रोजंदारी सेवकांचे दैनंदिन दरामध्ये ५० रुपये इतकी वाढ , बालवाडी शिक्षिका व सेविका यांना अदा करणेत येणाऱ्या दरमहा मानधनामध्ये ५०० रुपये इतकी वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मान्यता दिली. त्यानंतर मुख्यलेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळेकर यांनी आज परिपत्रक काढले आहे.
सोलापूर महानगरपालिका कर्मचारी -अधिकारी, सेवानिवृत्त सेवक व माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांना ३ टक्के इतका महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्याचा दर ४४ टक्के वरून ४७ टक्के इतका करण्यात आला आहे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत रोजंदारी सेवकांचे दैनंदिन दरामध्ये ५० रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे. सध्या सोलापूर महानगरपालिकेत कार्यरत बालवाडी शिक्षिका व सेविका यांना अदा करणेत येणाऱ्या दरमहा मानधनामध्ये ५०० रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे.या प्रमाणे सर्व खाते/विभाग प्रमुख यांनी माहे मे-२०२६ पेड इन जून २०२६ ची वेतन /निवृत्ती वेतन/कुटुंब वेतन/माध्यमिक प्रशालेकडील सेवानिवृत्त सेवकांचे बिले तयार करून अंतर्गत लेखापरिक्षक यांचेकडून तपासणी करून रक्कम अदायगीसाठी सादर करावीत. अंतर्गत लेखापरिक्षक यांनी सदर बिलांची तपासणी करताना व्यवसाय कराची खात्री करावी, असे महापालिकेचे मुख्यलेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
Post Views: 16