Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान

तरुण भारतbyतरुण भारत
May 28, 2026
in social
0
वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्काराने महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेचा पुण्यात सन्मान
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जाहिर करण्यात आलेल्या राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद वैशिष्ट्यपूर्ण शाखा म्हणून सोलापूरच्या महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण शाखेला गौरवण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवार दि. 26 मे रोजी झालेल्या या शानदार सोहळ्यात ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते तर ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, संगीतकार पं.सत्यशील देशपांडे, मसाप पुणे चे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मसाप दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी अविनाश महागांवकर, नगरसेवक सात्विक बडवे, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, श्रुती वडकबाळकर, अ‍ॅड. जे.जे. कुलकर्णी यांच्यासह राज्यभरातील साहित्यिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
गेल्या 120 वर्षापासून मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धन करत अनेक अनेक थोर लेखक, साहित्यिक यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही संस्था संपूर्ण देशात नावारुपाला आणली. संपूर्ण राज्यात तसेच देशात आणि परदेशातही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार झालेला आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाखा आहेत. या सर्व शाखांमधून अनेक चांगले उपक्रमाचे आयोजन करण्यात येवून मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन केले जात आहे. परिषदेच्या 121 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी अनेक पुरस्काराचे वितरण होते त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षीचा राजन लाखे पुरस्कृत कै. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा पुरस्कार सोलापूरच्या दक्षिण शाखेला जाहिर करण्यात आला.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरकडून कार्यक्रमाचे नेटके नियोजन, शिस्तबध्दता, तेच तेच पणा न आणता विविधता आणून प्रत्येकवेळी नवनवीन संकल्पना राबवणे, जास्तीत जास्त आणि नवनवे प्रेक्षकांपर्यत कार्यक्रम पाहोचवणे, पारंपारिक पध्दती सोबतच आधुनिकतेचा समावेश करणे, कार्यक्रमाचे आयोजन करताना वेळेचे योग्य नियोजन आणि दिलेल्या वेळेतच कार्यक्रम सुरू करून समारोप करण्याची परंपरा, वर्षभरात राबवलेल्या कार्यक्रमाचे अवलोकन करून वेळोवेळी त्याचा हिशोब, ऑडीट आणि अहवाल तयार करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्याकडे वेळेत पाठवणे, या सर्व महत्वाच्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवड समितीने दक्षिण सोलापूर शाखेला वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कारासाठी निवड केली. नेहमी विविध वैशिष्ठपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी शाखेचे अध्यक्ष रेणुका महागांवकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष प्रा,दीपक देशपांडे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर यांच्यासह दक्षिण शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. दि. 26 मे रोजी बालगंधर्व रंग मंदिरात वार्षिक ग्रंथ व विशेष ग्रंथकार पुरस्कार प्रदान सोहळा, मसाप जीवन गौरव व डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करून पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील विविध साहित्यिक आणि संस्थांचा गौरव यावेळी करण्यात आला.
सोलापूरच्या अश्‍विनी चव्हाण यांचा उत्कृष्ठ कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह असे सर्व पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी सोलापूरमधून अनेकजणांनी हजेरी लावलेली होती.
यावेळी अंजली कुलकर्णी, डॉ.आशुतोष जावडेकर, प्रमुख कार्यवाह सुनील महाजन सुनेत्रा मंकणी प्रसाद मिरासदार, प्रा. माधव राजगुरू डॉ. नीतीन संगमनेरकर,विभागिय कार्यवाह डॉ. संजीव गिरासे, जयंत येलूलकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकारी मंडळ व मसाप पुणे परिवार मोठ्यासंख्येने उपस्थित होता.

Post Views: 24
Previous Post

इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने इंगळे यांचा मानपत्र देऊन सन्मान

Next Post

कार्यरत , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ लागू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कार्यरत , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ लागू

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899588

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697