सोलापूर -अज्ञात कारणावरून एका 35 वर्षीय तरुणाने घराजवळील लिंबाच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मजरेवाडी परिसरातील शशिकला नगरात आज रविवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नंदकुमार नागनाथ वन्नाल (वय 35 वर्ष रा.शशिकलानगर मजरेवाडी, सोलापूर) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृतदेह घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत घरच्यांना आढळून आला. इतरांच्या साह्याने सदरचा मृतदेह गळफास सोडवून येथील शासकीय रुग्णालयात भाऊ लक्ष्मीकांत यांनी सकाळी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मयत नंदकुमार याच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई-वडील आणि भाऊ परिवार आहे. तो गवंडी काम करायचा.कोविडमधे घरगुती भांडणातून त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली ती अद्याप परतली नाही. आत्महत्येपूर्वी नंदकुमार हा मध्यरात्रीपर्यंत आईवडिलांसोबत बोलत घरात बोलत बसला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 6