सोलापूर – सेंट थॉमस स्कूल (आयसीएसई) आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने नुकतेच १९ नुकतेच ‘ग्रँड सायन्स एक्सपो २०२६’ मोठ्या उत्साहात पार पडले. ‘अर्थ टू स्पेस – गगनयान मिशन’ हे या विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य शीर्षक होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन भारताच्या विविध भागांतून उपस्थित असलेल्या सात रेव्ह. फादर्स व सात रेव्ह. सिस्टर्स यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाचे मुख्य आकर्षण म्हणजे पाहुण्यांच्या हस्ते सादर करण्यात आलेला ‘गगनयान मिशन’चा हुबेहूब देखावा ठरला. यात गगनयानच्या उड्डाणापासून ते लँडिंगपर्यंतचा संपूर्ण प्रवास अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला होता.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ५०० हून अधिक जिवंत व निर्जीव प्रयोग सादर केले. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयांसह कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आणि रोबोटिक्सवरील अत्याधुनिक प्रयोगांचाही समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख समन्वयक उजमा बडेवाले, सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी परिश्रम घेतले. प्राचार्य फादर रॉबिन आणि व्यवस्थापक फादर जोसेफ यांनी या सर्वांचे मनापासून कौतुक केले.
———






















