सोलापूर – विनायक नगर येथील येथील राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचा दहावीचा निकाल ८५.७१ टक्के इतका लागला. १० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणीत, ३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
प्रशालेतून रोहित राजू बसूदे (९१.६०%), अंकिता श्रीनिवास कुरापाटी (८६.६०%)श्रावणी मल्लेशम कुडक्याल (८६.२०%) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले. या विद्यार्थ्यांना विश्वनाथ तंबाके,संगीता नरगिडे,भाग्यश्री महाजन, मारुती कांबळे, मंजिरी धुमशेट्टी, चंद्रशेखर पाटील,रोहित हत्तरगी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, सचिव रविशंकर कुंभार,प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार आदींनी अभिनंदन केले.

























