Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रायगड जिल्ह्यात 1 लाख 2 हजार खासगी तर 271 सार्वजनिक मंडळाचे गणपती

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 11, 2023
in maharashtra
0
रायगड जिल्ह्यात 1 लाख 2 हजार खासगी तर 271 सार्वजनिक मंडळाचे गणपती
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 2 हजार खासगी तर 271 सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार असून पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना वाहतूक बंदीचे व वाहतूक नियोजनाचे दिनांक निहाय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गणेशोत्सवसाठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असून पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे.

गणेशोत्सव 2023 शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गणेश उत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क झाले आहे.

गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, 10 सुविधा केंन्द्र, 10 क्रेन, अॅम्ब्युलन्स एकूण वॉर्डन 450 व होमगार्ड 100 नेमण्यात आले आहेत. यासह खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल.

वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. येथे महामार्ग चौपदरीकरणाचे प्रगतीचे फोटो गॅलरी द्वारे प्रदर्शन करण्यात येईल.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार 16 सप्टेंबर 203 रात्री 12 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2023 रात्री बारा वाजेपर्यंत तसेच 23 सप्टेंबर 203 सकाळी 8 वाजेपासून ते 25 सप्टेंबर 2023 रात्री 8 वाजेपर्यंत तसेच 28 सप्टेंबर 2023 सकाळी 8 वाजेपासून ते 30 सप्टेंबर 2023 रात्री 8 वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत. यासह 20, 22 , 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी दिवसा बंदी घातण्यात आली असून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही.

या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस ,सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे 28 सप्टेंबर 2023 रोजी आणि 21 दिवसाचे गणपती 10 आॅक्टोबर 2023 रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. यातील समुद्रावर 52 गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये 105 गणेशमुर्ती विसर्जन, नदीमध्ये 244 गणेशमुर्ती विसर्जन, तलावामध्ये 100 गणेशमुर्ती विसर्जन व इतर ठिकाणी 94 गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे . या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडून सुविधा नियोजन व उपायोजना करण्यात येत आहे.

जिल्हयात 271 सार्वजनिक गणपती व 1,02,581 खाजगी गणपती स्थापना होणार आहे.

दि 28 रोजी अनंतचतुर्थी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. जिल्हयात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असुन विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हददीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

गणपती उत्सवादरम्यान जिल्हयात पोलिस,होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी एटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असुन सोशल मिडीया देखरेख करण्याकरीता सायबर सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत आहेत.

Post Views: 91
Previous Post

मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शनात पदार्पण

Next Post

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत चांगला प्रतिसाद

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत चांगला प्रतिसाद

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत चांगला प्रतिसाद

ताज्या बातम्या

निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम

April 10, 2026

एचआयव्ही संसर्गाचा चुकीचा रिपोर्ट आला आणि क्षणात संसार मोडला

April 10, 2026

नाशिक मध्ये ओळख लपवून दोन हिंदू मुलींना फसवले

April 10, 2026

स्वेरी कॉलेजवर पेटले विद्यार्थ्यांचे आंदोलन

April 10, 2026

भरदिवसा पेट्रोल पंपावर नवऱ्याने केला बायकोचा खून

April 10, 2026
मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

April 10, 2026
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

April 10, 2026
श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0798600

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697