सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या नवीन 482 एकर परिसरामध्ये वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून वृक्षारोपण करून पर्यावरणाप्रती आपुलकी व जबाबदारी जोपासली. विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रा. डॉ प्रकाश महानवर व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित एकदिवसीय साखळी शिबिरामध्ये वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या एकाकाने विद्यापीठातील 482 एकर परिसरामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपण केले. यामध्ये फणस, संत्री, इडलिंबू, आवळा, आंबा तसेच इतर औषध उपयोगी असणाऱ्या अशा एकूण 240 रोपांचे रोपण करण्यात आले. सदर उपक्रमातून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ पर्यावरण व त्याच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण केले पाहिजे असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. या उपक्रमामध्ये विद्यापीठातील कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. याप्रसंगी विद्यापीठाच्या रासेयोचे संचालक डॉ राजेंद्र वडजे यांनी ‘वृक्षारोपणाचे महत्त्व व पर्यावरणाचे संवर्धन’ याविषयी माहिती तसेच वृक्षारोपणाचे भविष्यामध्ये अधिकपणे लागवड होणे गरजेचे असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. सदर उपक्रम यशस्वी होण्यामध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विजय वडेर, डॉ. अमोल शिंदे व डॉ पद्मावती पाटील यांनी योगदान दिले या यशस्वी उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
—–
Post Views: 26