दिल्लीच्या मुखर्जी नगर भागातील मुलींच्या वसतिगृहात बुधवारी संध्याकाळी आग लागली. इमारतीत सुमारे 35 मुली अडकल्या होत्या, या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवली आहे. अग्निशमन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पायऱ्यांजवळील मीटर बोर्डमध्ये आग लागली. त्यानंतर ही आग वसतीगृहाच्या संपूर्ण इमारतीत पसरली. ज्या ठिकाणी आग लागली ती 5 मजली इमारत असून, छतावर स्वयंपाकघर आहे. दिल्ली अग्निशमन सेवेच्या संचालकांनी सांगितले होते की, मुखर्जी नगरमधील सिंगुचर अपार्टमेंटमध्ये बांधलेल्या पीजीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. त्यांनी परिश्रमपूर्वक इमारतीत अडकलेल्या विद्यार्थीनींची सुखरूप सुटका केली तसेच आगीवर नियंत्रण मिळवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हॉस्टेलला लागलेल्या आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















