Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत; २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 29, 2023
in maharashtra
0
विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत; २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आधुनिक रस्ते व पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करत असताना आज वाशिम येथे राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील ३,६९४.५१ कोटी रुपये किंमतीच्या व १३३.८५ किमी लांबीच्या अकोला-मेडशी, मेडशी-वाशिम व पांगरे-वारंगाफाटा भागांच्या चौपदरीकरणाचे वाशिमच्या खासदार भावना गवळी जी, सर्व आमदार, जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या वाशिम जिल्ह्यात मागील ९ वर्षांत तब्बल २२७ किमी महामार्गांचे जाळे निर्माण करण्यात आले, यामुळे जिल्ह्यामध्ये विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. रस्ते बांधणीच्या माध्यमातून राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास साधता येतो. यासाठी महामार्गांचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्रातील अकोला ते तेलंगणा राज्यातील संगारेड्डी पर्यंत ४-लेनचा राष्ट्रीय महामार्ग १६१ हा दोन्ही राज्यांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. अकोल्यापासून सुरू होणारा हा महामार्ग महाराष्ट्रातील अकोला, वाशिम, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांना जोडतो, तर पुढे तेलंगणा राज्यातील देगलुर व संगारेड्डी जिल्ह्यांमधून जातो.
एकूण ३ पॅकेजमध्ये विभागित या महामार्गाच्या पहिल्या अकोला ते मेडशी या ४८ किमीच्या आणि १,२५९ कोटी रुपये किंमतीच्या पॅकेज अंतर्गत चार उड्डाणपूल, १० अंडरपास व ८५ कल्व्हर्ट्स आहेत. मेडशी ते वाशिम या ४५ किमी लांबीच्या व १,३९४ कोटी रुपए किंमतीच्या दुसऱ्या पॅकेज अंतर्गत १३ बस शेल्टर, ६-लेन आरओबी व वाशिम शहर बायपासचा समावेश आहे. तसेच पांगरे ते वारंगाफाटा या ४२ किमी लांबीच्या व १०४२ कोटी रुपये किंमतीच्या तिसऱ्या पॅकेज अंतर्गत कयाधू नदीवरील मुख्य पुल, कळमनुरी तसेच आखाडा-बाळापूर शहर बायपासचा समावेश आहे.
या महामार्गामुळे अकोला, वाशिम, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे जोडली जातील. शेगावचे गजानन महाराज मंदिर, अकोल्याचा शाहनूर किल्ला, अंतरिक्ष जैन मंदिर, आठवे ज्योतिर्लिंग औंढा-नागनाथ, संत नामदेव महाराज संस्थान, नर्सी आणि नांदेडमधील तख्त सचखंड गुरुद्वारा यांसारख्या धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना पोहोचणे सोपे व सुलभ होईल. तेलंगाणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील व्यापाराला चालना मिळेल, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, कृषी उत्पादनांना बाजारपेठांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल.
सदर राष्ट्रीय महामार्ग १६१च्या निर्माण कार्यात ‘अमृत सरोवर’ योजनेंतर्गत सावरगाव बर्डे, झोडगा खुर्द, चिवरा, अमानी, सायखेडा या गावांमधील तलावांचे खोलीकरण करण्यात आले आणि त्यातून मिळालेल्या माती, रेती यांचा वापर रस्तेनिर्मितीसाठी करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणच्या तलावांतील पाणी संचयात १०१७ टीसीएस ने वाढ झाली आहे. तसेच परिसरातील जलक्षमतेतही वाढ झाली आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक पायाभूत सुविधा व रस्ते निर्मितीच्या माध्यमातून वाशिम जिल्हा, विदर्भ, मराठवाडा तसेच एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
Post Views: 89
Previous Post

मणिपूर ‘अशांत क्षेत्र’, १ ऑक्टोबरपासून सहा महिन्यांसाठी ‘अफ्स्पा’ लागू

Next Post

मराठी महिलेला घर नाकारणं घटनाबाह्य असतं का?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठी महिलेला घर नाकारणं घटनाबाह्य असतं का?

मराठी महिलेला घर नाकारणं घटनाबाह्य असतं का?

ताज्या बातम्या

एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

June 4, 2026
एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

June 4, 2026
कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षसंवर्धनात उद्योगांची पुढाकार; सरकारी यंत्रणांकडूनही त्याच तत्परतेची अपेक्षा

कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षसंवर्धनात उद्योगांची पुढाकार; सरकारी यंत्रणांकडूनही त्याच तत्परतेची अपेक्षा

June 4, 2026
‘एम बी चॅलेंजर’ची ‘पॅंथर’वर वर मात; एन.जी. क्रिकेट अकॅडमीची स्पर्धा

‘एम बी चॅलेंजर’ची ‘पॅंथर’वर वर मात; एन.जी. क्रिकेट अकॅडमीची स्पर्धा

June 4, 2026

तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीचा सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रम ८ जून पासून सुरु

June 4, 2026
शहरात वाहतूक नियमांचे तीनतेरा  –  आधिक महिन्यामध्ये नो-पार्किंग, वॉकर झोनचेउल्लंघन. 

शहरात वाहतूक नियमांचे तीनतेरा  –  आधिक महिन्यामध्ये नो-पार्किंग, वॉकर झोनचेउल्लंघन. 

June 4, 2026

दोन ठिकाणी घरफोडी; दागिने व रोकड लंपास

June 4, 2026
सीआरएस (CRS ) पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांचे कामकाज ठप्प

सीआरएस (CRS ) पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे जन्म-मृत्यू दाखल्यांचे कामकाज ठप्प

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893348

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697