सतीश फत्तेपूरे :- तुळजापूर – शेतकऱ्यांनो झेंडा कुण्याही पक्षाचा घ्या पण दांडा शेतकऱ्यांचाच असावा असे आवाहन करीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटच्या श्वासापर्यत स्वाभिमानी शेतकरी संघटना शाषणाला भिडणारच असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी 2022 मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकविमा भरलेल्या सर्वशेतक-ना पिकविमा रक्कम तात्काळ द्या यासह पुरेशा दाबाने वीज पुरवठा करा नियमीत कर्ज भरणा-यांना पन्नास हजार तात्काळ द्या या सह अनेक मागण्यांसाठी मंगळवार दि २७ रोजी बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना वतीने करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
नाताळ सुट्या व मंगळवार असल्याने तिर्थक्षेञ वाहने मोठ्या प्रमाणात आली होती त्यातच जुने बसस्थानक समोरील चौकात रस्ता रोको आंदोलन केल्याने चार महामार्गावरुन जाणारी वाहतुक रोखुन वाहनांचा लांबचालांब रांगा लागल्या होत्या .
यावेळी तहसिलदार समोर टमटे रस्त्यावर ओतुन शाषणाचा निषेध केला
यावेळी बोलताना इंगळे म्हणाले आपल्या बापाचा घाम कुणी तुडवत असेल तर त्याला सोडु नका पिकविमा आणला म्हणून बोर्ड लावता तसाच कारखाने सुतगिरण्या सहकार संस्था बंद पडल्याचे ही बोर्ड लावा असे यावेळी सत्ताधारींना आवाहन केले.माझावर शेतकऱ्यांन साठि केलेल्या आंदोलना बाबतीत चाळीस केसेस केल्या आहेत तरीही मी घाबरत नाही शेवटच्या श्वासापर्यत शेतकऱ्यांच्या प्रश्ना बाबतीत शाषणाला लढणारच असे यावेळी जाहीर केले तुळजापूरात आंदोलन का करता असे आम्हाला पोलिस विचारतात अरे तुळजाभवानी शेतकऱ्यांची कुलदैवता आहे त्यामुळे ती शाषाणाला बुध्दी घालेल म्हणून देवीदारीनतमस्तक होवुन आम्ही शेतकरी आंदोलन करतो असे यावेळी म्हणाले .पिकविमा नुकसान भरपाई अनुदान अखंडीत वीज पुरवठा न केल्यास पुनश्च यापेक्षा तीव्र आंदोलन करु व होणाऱ्या परिणमाला सरकार जबाबदार राहिल असे यावेळी म्हणाले
यावेळी टमाटे दर गडगडल्या बद्दल रस्त्यावर टमाटे फेकुन निषेध केला .व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदार सौदागर तांदळे यांना रस्ता रोको स्थळी दिले.
यावेळी स्वाभिमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्रइंगळे उपाध्यक्ष धनाजी पेंदे तालुकाध्यक्ष दुर्वास भोजणे नेताजी जगदाळे उत्तम अमृतराव सतिश डोके नरसिंग पाटील डाँ अनिल धनकेप्रदीप भोजणे प्रदीप जगदाळे चंद्रकांत नरोळे सुशांत गाडे अदि सह हजारो शेतकरी यात सहभागी झाले होते.

















