Tuesday, July 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मागून ठोकर दिल्याने ट्रॅक्टर उलटला, शेतकऱ्याचा मृत्यू, अपघातस्थळी कांद्याचा सडा, मन हेलावणारं दृश्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 20, 2024
in maharashtra
0
मागून ठोकर दिल्याने ट्रॅक्टर उलटला, शेतकऱ्याचा मृत्यू, अपघातस्थळी कांद्याचा सडा, मन हेलावणारं दृश्य
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तरुण शेतकरी अजय कानडे ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन मालेगावकडे चालले होते. सकाळी लवकर बाजार समितीत नंबर लावण्यासाठी ते भल्या पहाटेच निघाले होते. अन्…

 

 

मनमाडहून नंदुरबारला जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला, तर बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. मनमाड-मालेगाव मार्गावरील चोंडी घाटात शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला. बसचालक जखमी झाला असून, त्याच्यासह जखमींवर मालेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड आगाराची मनमाड-नंदुरबार बस (क्र. एमएच १४, बीटी ०८४६) शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मनमाडहून निघाली. चोंडी घाटाच्या पायथ्याजवळून बस जात असताना मालेगावकडे कांदा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला बसने जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रॅक्टरचालक अजय कानडे (वय ४१, रा. कानडगाव) हा शेतकरी जागीच ठार झाला. बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते. त्यात बसचालक संजय कातकडे यांच्यासह दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना मालेगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी ट्रॅक्टरमधील कांद्याचा खच पडल्याचे दिसून आले. अपघात घडल्याचे समजताच मालेगावचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक रामराजे तसेच वाहतूक निरीक्षक कल्पेश कानडे व मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

कांदाविक्री राहिली, जीवही गेला…

कानडगाव येथील तरुण शेतकरी अजय कानडे ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन मालेगावकडे चालले होते. सकाळी लवकर बाजार समितीत नंबर लावण्यासाठी ते भल्या पहाटेच निघाले होते. कांदे विकून घराकडे परतावे, अशी त्यांची अपेक्षा होती. पण पाठीमागून आलेल्या बसने त्यांचा घात केला. कांद्याची विक्री व पैसे मिळणे बाजूलाच राहिले आणि हकनाक जीव गेला. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले कांदे पाहून परिसरातील शेतकरी बांधवांना गहिवरून आले..

 

 

अपघातातील जखमी

संजय कातकडे (बसचालक), किसनराव शिंदे (७५, रा. नांदेड), बापू गायकवाड (५८, टेहरे, ता. मालेगाव), तुकाराम इटकर (४१, हिंगोली), अनिल मिश्रा (५१) व रिता मिश्रा (४६, अकोला), पुंडलिक बोडके (३५, हिंगोली), दीपाली जाट (३५), कविता जाट (३२, सोयगाव ता. मालेगाव), सुशीला चपेले (६५ रा. परभणी), सीमा बसमतकर (४०, रा. परभणी), सुधीर बोदडे (३८, मनमाड), नीलेश बारसे (३४, मनमाड), उत्तम इटकर (४५, हिंगोली)

Post Views: 80
Previous Post

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापूर येथील रे नगर, या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती देणारी ध्वनीचित्रफित…

Next Post

केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

केंद्र सरकारकडून हत्यार म्हणून ईडीचा वापर, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

ताज्या बातम्या

इंद्रायणीला महापूर वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन #viral #maharashtranews #news

July 6, 2026

मंद गतीने चालणाऱ्या कामाचा निषेध केला हटके स्टाईलने #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

B2 च्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

अबब त्या चोराला पकडायला 200 सीसीटीव्ही तपासले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0962323

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!