Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टाटा बस नाम काफी है! संपूर्ण पाकिस्तानवर टाटा ग्रुप भारी, काय कमाल केली पाहाच

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 21, 2024
in india
0
टाटा बस नाम काफी है! संपूर्ण पाकिस्तानवर टाटा ग्रुप भारी, काय कमाल केली पाहाच
0
SHARES
72
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 टाटा समूहातील कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्याने पाकिस्तानच्या ‘जीडीपी’ला मागे टाकले आहे. याचा अर्थ टाटा समूहाचे एकूण मूल्य आता आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक झाले आहे. मीठापासून सॉफ्टवेअरपर्यंतची निर्मिती करणाऱ्या या समूहाने वर्षभरात चांगला परतावाही दिला आहे.

 

एका अहवालानुसार, टाटा समूहाचे एकूण बाजारमूल्य (मार्केट कॅप) सुमारे ३६५ अब्ज डॉलर अर्थात ३० लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. समूहाच्या बाजारमूल्याने पाकिस्तानच्या ‘जीडीपी’ला मागे टाकण्याची कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मते पाकिस्तानचा ‘जीडीपी’ जवळपास ३४१ अब्ज डॉलर आहे.

 

समूहात ‘टीसीएस’ अव्वल

 

टाटा समूहातील नोंदणीकृत कंपन्यांपैकी एक आणि आयटी क्षेत्रातील अग्रणी ‘टीसीएस’चे एकूण बाजारमूल्य सुमारे १५ लाख कोटी रुपये (१७० अब्ज डॉलर) आहे. ‘आयएमएफ’च्या मते, एकट्या ‘टीसीएस’चे बाजारमूल्य पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या निम्मे आहे. समूहाच्या अन्य कंपन्यांनीही एकूण बाजारमूल्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘टीसीएस’पाठोपाठ ‘टाटा मोटर्स’ आणि ‘ट्रेंट’चे योगदान मोठे आहे.

 

‘टाटा मोटर्स’ची घोडदौड

‘टाटा मोटर्स’च्या समभागांत वर्षभरातच ११० टक्के तेजी आली असून, ‘ट्रेंट’चे समभाग २०० टक्क्यांनी उसळले आहेत. याशिवाय ‘टाटा टेक्नॉलॉजीज’, ‘टीआरएफ’, ‘बेनेरास हॉटेल्स’, ‘टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन’, ‘ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा’ आणि ‘आर्टलन इंजिनीअरिंग’ या समभागांनीही चांगली कामगिरी केली आहे. ‘टाटा समूहा’तील किमान २५ कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्यात आली आहे. ‘टाटा केमिकल्स’च्या समभागांत वर्षभरात पाच टक्क्यांची घसरण झाली आहे. समूहातील ‘टाटा सन्स’, ‘टाटा कॅपिटल’, ‘टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम’ आणि ‘एअर इंडिया’ या कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत.

 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आर्थिक संकटात सापडली असून, देशावर १२५ अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज आहे. याशिवाय ‘आयएमएफ’ने दिलेल्या तीन अब्ज डॉलरच्या मदतीचा उपक्रम मार्चमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था आणखी बिकट होणार आहे. देशाची परकी चलनाची गंगाजळी आठ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. या निधीतून केवळ दोन महिनेच आयात करता येईल. कर्ज आणि ‘जीडीपी’चे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे क्रेडिट रेटिंग एजन्सींनी चिंता व्यक्त केली आहे.

 

भारतीय अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलियन डॉलरवर

भारताची अर्थव्यवस्था ३.७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था जवळपास ११ पट मोठी आहे. आर्थिक वर्ष २०२८पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. सध्या भारत पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे.

 

‘टाटा समूहा’चे बाजारमूल्य

३६५ अब्ज डॉलर

 

पाकिस्तानचा ‘जीडीपी’

३४१ अब्ज डॉलर

Post Views: 77
Previous Post

एक फोन अन् जळगाव पोलिसात खळबळ, रेल्वे रुळावर पोहोचताच…

Next Post

मनोज जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अल्टीमेटम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मनोज जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अल्टीमेटम

मनोज जरांगेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा, सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी अल्टीमेटम

ताज्या बातम्या

दयानंद महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात 

February 16, 2026

मंद्रूपच्या मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

February 16, 2026

श्री मल्लिकार्जुन मंदिरात महाशिवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

February 16, 2026

एशियन इनोव्हेटिव्ह मॉडर्न स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय

February 16, 2026

महाशिवरात्रीनिमित्त ‘ॐ नमः शिवाय’ जपाचा अखंड जागर; श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची अभूतपूर्व मांदियाळी

February 16, 2026

माढ्यात महापुरुषांच्या जयंती मिरवणूका डीजे मुक्त होणार –  एपीआय रोहित शिंदे

February 16, 2026

माळशिरस कृषी चषक स्पर्धेत आर बी माने अवेंजर्स अजिंक्य

February 16, 2026

महाशिवरात्री विशेष ग्रंथांना सोलापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682640

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697